क्राईम

पूर्णाड फाट्यावर अडीच कोटी रुपयांचा गुटखा जप्त.

मुक्ताईनगर प्रतिनिधी

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड फाटा येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत २ ते अडीच कोटी रुपयांचा गुटखा पकडला आहे. या कारवाईत वाहनासह कोट्यावधी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की,मुक्ताईनगर तालुक्यातील पुर्णाड फाटाजवळ अवैधरित्या परराज्यातून गुटख्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मुक्ताईनगर पोलिसांना मिळाली त्यानुसार पथकाने रात्री कारवाई करत पोलिसांची दीड ते अडीच कोटी रुपयांचा गुटखा जप्त केला. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन कारवाई केली आहे.यावेळी पोलिसांनी जप्त केलेल्या ट्रक मधून सुमारे दोन ते अडीच कोटी रुपयांचा गुटखा हस्तगत करण्यात आला आहे. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button