प्रवज्जा फाउंडेशन तसेच नायगाव ग्रामस्थ यांच्या वतीने आज दिनांक 23 रोजी नायगाव तालुका मुक्ताईनगर येथे बहुजन महापुरुषांच्या संयुक्त जयंती निमित्त सत्यपाल महाराजांचा भव्य प्रबोधनात्मक कार्यक्रम

:-सविस्तर वृत्त असे की मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव येथे प्रवज्जा फाउंडेशन तसेच नायगाव ग्रामस्थ यांच्यावतीने सालावादाप्रमाणे बहुजन महापुरुषांच्या संयुक्त जयंती निमित्त प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो त्याच अनुषंगाने आज दिनांक 23 रोजी सप्त खंजिरी वादक अंधश्रद्धा आणि बुवाबाजी वर तिखट प्रहार करणारे सत्यपाल महाराज यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे हा कार्यक्रम संध्याकाळी सहा वाजता नायगाव येथे पिंपरी नांदू रोडवर आयोजित केलेला आहे तरी पंचक्रोशीतील बहुजनांनी मोठ्या संख्येने सत्य पाल महाराजांच्या कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रवच्जा फाउंडेशनचे अध्यक्ष सारीपुत्र गाढे सचिव नितीन गाढे युवा उद्योजक संचालक प्रतिभा फायर गौतम प्रधान तसेच बहुजन मुक्ती पार्टी महाराष्ट्र राज्य संघटक प्रमोद सौंदळे यांच्यातर्फे करण्यात आलेले आहे



