जळगावा जिल्हामहाराष्ट्र

धक्कादायक : निवृत्त वृद्धाची १९ लाखांत ऑनलाईन फसवणूक

जळगाव प्रतिनिधी

भुसावळ शहरातील तापी नगरात राहणाऱ्या एका ६५ वर्षीय वृद्धाला बँकेचे व्यवहार घरपोच करून देऊन चांगले रिटर्न मिळवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल १९ लाख ४०५ रुपयांची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील तापी नगरमधील प्रदीपसिंह प्रतापसिंह परदेशी (वय ६५) हे वृद्ध आपल्या परिवारासह वास्तव्याला असून ते सेवानिवृत्त आहेत. दरम्यान, १० मार्च २०२३ ते ६ डिसेंबर २०२३च्या दरम्यान जळगाव येथे राहणारे संदीप चौधरी व सोनाली चौधरी यांनी प्रदीपसिंह परदेशी यांना बँकेचे व्यवहार घरपोच करून देऊन चांगले रिटर्न मिळवून देऊ, असे सांगितले. त्यानंतर त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून कॅश, ऑनलाईन व चेकद्वारे तब्बल १९ लाख ४०५ रुपये स्वीकारून त्याच्या मोबदल्यात बनावट व हुबेहूब दिसणारे कागदपत्र तयार करून त्यांच्या घरी आणून अपहार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्रदीपसिंह परदेशी यांनी २५ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन या संदर्भात तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी संदीप चौधरी व सोनाली चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पीएसआय विजय गायकवाड करत आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button