मलकापुर विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार राजेश पंडितराव एकडे निवडणुक प्रचारार्थ रॅली मध्ये मतदारांचा आशीर्वाद घेण्यासाठी येणार आहे

मलकापूर प्रतिनिधी:-मलकापुर विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. राजेश पंडितराव एकडे निवडणूक प्रचारार्थ मतदारांचा आशिर्वाद घेण्यासाठी मंगळवार दि. 12 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 8:00 वाजता शिवाजीनगर मलकापुर येथुन आई भवानी चे दर्शन घेऊन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रचार रॅलीची सुरुवात होऊन चार खंबा चौक , वल्ली चौक , गांधी चौक , छोटा बाजार , मोहनपुरा , दुर्गा नगर , बारादारी , किल्ला चौक , मंगल गेट , लखानी चौक , सायकलपुरा , अब्दुल हमीद चौक , भिम नगर , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून माता महाकाली नगर माता माता महाकाली चे दर्शन घेऊन समर्थ आखाडा समोरून ज्ञानेश्वर नगर , रोहिदास नगर पाटबंधारे कार्यालयासमोर पोहोचुन समारोप करण्यात येणार आहे.
तरी महाविकास आघाडीचे सर्व नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सकाळी 8:00 वाजता भवानी मंदिर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शिवाजीनगर मलकापुर येथे उपस्थित रहावे ही नम्र विनंती.



