न.प. तेल्हारा कडून लोककला व पथनाट्यातून मतदार व मतदान जनजागृती!

नगर परिषद, तेल्हारा व साने गुरुजी कला मंडळा कडून आयोजन
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे
तेल्हारा
तालुका प्रतिनिधी –
तेल्हारा नगर परिषद व्दारा शहरात दि.०८ नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ अंतर्गत जिल्ह्यात दि.२० तारखेला मतदान होणार असुन अकोला जिल्ह्याचे व तेल्हारा तालुक्याचे आणि शहराचे मतदान टक्यात वाढ होण्याकरिता व लोकशाही बळकट करण्यासाठी ‘चुनाव का पर्व देश का गर्व’ व स्विप उपक्रमांतर्गत लोककला व पथनाट्या व्दारे साने गुरुजी कला व सांस्कृतिक बहुउद्देशीय मंडळ पातुर यांच्यावतीने शहरात मतदार व मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी न.प. तेल्हारा चे प्रशासक तथा मुख्याधिकारी सतीश गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक येथे पातूर येथील साने गुरुजी मंडळाने व विशाल राखोंडे लिखीत पथनाट्य व लोककला जनजागृती कार्यक्रमातुन कलावंतांनी वासुदेव व गोंधळी आणि विविध भुमिका घेऊन सर्वांचे लक्ष वेधले तर विविध पथनाट्य व लोकनाट्यातून आणी लोकगीतातून मंडळाचे अध्यक्ष लोककवि सागर राखोंडे, सुखदेव उपर्वट, सिद्धार्थ इंगळे, प्रकाश इंगोले, गजानन आवटे, कैलास शिरसाट, गणेश देवकर, श्याम उगले, महेश निंबोळे, प्रज्वल इंगळे यांनी सादर करत तेल्हाराकर वोट कर’ या घोष वाक्यातून आणि विविध लोकगीतातून व पथनाट्यातुन जनजागृती करत सर्वांनी मतदान करण्यासाठी वृध्द व दिव्यांग यांना मदत करण्याकरिता व स्वीप उपक्रमांतर्गत मतदान टक्यात वाढ होण्याकरिता न.प.तेल्हारा चे प्रशासक तथा मुख्याधिकारी सतीश गावंडे यांनी आवाहन केले.
यावेळी सर्व विभागांचे विभाग प्रमुख व कर्मचारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी जनजागृतीच्या कार्यक्रमात तेल्हारा शहरातील नागरिक बहु संख्येने सहभागी झाले होते.



