महाराष्ट्र
अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठीवाशिम जिल्ह्याचे आयपीएस अधिकारी नवदीप अग्रवाल यांचे जनतेला आवाहन…..

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
दिनांक 07 नोव्हेंबर
मालेगाव : – वाशिम जिल्ह्यातील वाशिम उपविभाग अंतर्गत येणारे पोलीस स्टेशन वाशिम शहर ,वाशिम ग्रामीण, रिसोड, मालेगाव, आणि शिरपूर या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कुठल्याही प्रकारचे अवैध धंदे चालू असल्यास नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी 9172713974 या नंबर वर सदर अवैध धंद्याबाबत माहिती द्यावी. सदरची माहिती ही या नंबरच्या व्हाट्सअप वर लोकेशन सहित द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. असे अहवान वाशिम जिल्ह्याचे आयपीएस अधिकारी नवदीप अग्रवाल यांच्याकडून सामान्य जनतेच्या सहकार्याने अवैध धंद्याला आळा घालण्याच्या दृष्टिकोनातून एक चांगले उपक्रम राबवण्याच्या उद्देशाने सामान्य जनतेला माहिती देण्याचे आव्हान करण्यात आले.



