महाराष्ट्र
शालेय जिल्हास्तरीय धावण्याच्या स्पर्धेत अभिषेक संतोष अवचार यांनी वाशीम मधून प्रथम क्रमांक पटकाविला..

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगाव : – जवळका रेल्वे या गावातील रहावाशी असलेले अभिषेक संतोष अवचार या 17 वर्षीय युवकाने श्री शिवाजी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय जवळका रेल्वे मध्ये अकरावीचे शिक्षण घेत. 2024-2025
शालेय जिल्हास्तरीय धावण्याच्या क्रीडा प्रकारात
वाशिम येथील जिल्हा क्रीडांगणा येते घेण्यात आलेल्या 17 वर्षीय शालेय जिल्हास्तरीय 800मीटर धावण्याच्या स्पर्धेत 17 वर्षीय वयोगटातील 16 स्पर्धकांमधून प्रथम क्रमांक पटकवून आपला व आपल्या शाळेचा नाव उंचावला आहे.
या यशामुळे अभिषेक संतोष अवचार यांचे जिल्हाभर कौतुक होत आहे या यशाचे शौर्य तो आपल्या शाळेतील, मार्गदर्शक,शिक्षक, व आई-वडील यांना देत आहे
अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते जावेद धन्नू भवानीवाले यांच्याकडून मिळाली.



