महाराष्ट्रसामाजिक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून शनिवार दि.19 ऑक्टोंबर रोजी तेल्हारा शहरात होणार विजयादशमी उत्सवानिमित्त शस्त्रपूजन व पथसंचलन! राष्ट्रप्रेमींना उपस्थित राहण्याचे केले आवाहन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी

तेल्हारा दि.16/ऑक्टोबर 2024 | सेठ बन्सीधर दहिगावकर हायस्कूल एज्युकेशन सोसायटी तेल्हारा द्वारा संचालित स्वामी विवेकानंद ज्ञानपीठ तेल्हारा येथील प्रांगणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तेल्हारा शाखेचा विजयादशमी उत्सव , शस्त्र पूजन कार्यक्रम दि.१९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वा. आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमामध्ये कार्यक्रम प्रमुख अतिथी म्हणून शासकीय ग्रामीण रुग्णालय तेल्हारा येथील सेवानिवृत्त वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक तापडिया उपस्थित राहणार असून रा.स्व.से. संघाचे विदर्भ प्रांत कार्यवाह अजय नवघरे मुख्य वक्ता म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमापूर्वी सायंकाळी ५ वाजता समारंभ स्थानावरून १५० गणवेश धारी स्वयंसेवकांचे सदंड, सघोष पथसंचलन होणार आहे . या पथसंचालनाचा मार्ग डाक कार्यालय, साठे मार्केट, लटियाल भवानी मंदिर चौक, अष्टविनायक मंदिर, संताजी चौक, महाराणा प्रताप चौक, नगरपरिषद बगीच्या, जुने शहर, कसबा हनुमान मंदिर, श्री शिवाजी चौक, विश्वशांती चौक, लोकमान्य चौक, सराफ लाइन, श्रीराम मंदिर, श्रीरामदेवबाबा मंदिर, मोचीपुरा चौक, भाजी मंडी, मातोश्री बँक, टॉवर चौक मार्गे स्वामी विवेकानंद ज्ञानपीठ असा राहणार आहे. राष्ट्रप्रेमी नागरिक बंधू, माता, भगिनींनी उपस्थित राहण्याचे आवाहन नगर संघ चालक गजानन मुंजे, नगर कार्यवाह शेखर देशमुख
यांनी प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button