फुटबॉल कोचचा विजेचा शॉक लागून मृत्यू

भुसावळ:- शहरातील रेल्वे नॉर्थ कॉलनी येथील 35 वर्षीय रहिवासी व फुटबॉल कोच हे आरपीएफ बँरेक येथे फुटबॉल कोचिंग करून स्विच बंद करायला गेले असते त्याच वेळेस त्यांना विजेचा शॉक लागला व यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना 16 रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली
याबाबत सूत्राच्या करून मिळालेल्या माहितीनुसार सिद्धार्थ अनिल पवार वय 35 राहणार नॉर्थ कॉलनी भुसावळ हे आरपीएफ बँरेक येथे फुटबॉल कोचिंग करत होते 16 रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास स्विच ऑफ करण्यास गेले असता त्या वेळेस त्यांना विजेचा शॉक लागल्याने त त्यांना औषध उपचारासाठी खाजगी रुग्णालयात घेऊन गेले असता तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
दिलीप किशन पवार ( 59) यांच्या खबर वरून शहर पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मुक्तीचे नोंद करण्यात आली आहे तपास पोलीस नाईक रज्जा खान हे करीत आहे.
दरम्यानवृत्त सिद्धार्थ पवार यांच्या पक्षात आ,ई भाऊ बहीण असा परिवार आहे.



