ग्रामपंचायत कवरदरी येथे सामाजिक अंकेक्षण प्रक्रिया दरम्यान आमदार अमित झनक यांची भेट..

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगाव :- तालुक्यामधील ग्रामपंचायत कवर्दरी येथे सामाजिक अंकेक्षण प्रक्रिया दरम्यान व्ही आर पी ज्ञानेश्वर कराळे व प्रवीण सावके यांनी दिनांक 30- 9 -2024 रोजी ग्राम कवरदरी येथे गावांमधील शेतकरी ,कष्टकरी ,व जॉब कार्ड धारक व्यक्ती यांना रोजगार सेवक यांच्यामार्फत सामाजिक अंकेक्षण कसे असतात व गावांमधील जॉब कार्ड धारक व्यक्तींना आपल्या ग्रामपंचायत मध्ये काम कसे उपलब्ध होते व सिंचन विहीर, गुरांचा कोठा ,घरकुल, वृक्ष लागवड ,पांदण रस्ते, अशा असंख्य सरकारी योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत चालू आहे .
पण गावामधील या योजनेबद्दल आजपर्यंत ही माहिती नव्हती .अशी योजना आपल्याला आपल्या गावामध्येच काम उपलब्ध करून देत आहे शेतकऱ्याला शेतीसाठी वृक्ष लागवड, बांधावर वृक्ष ,लागवड गुरांचा गोठा, शेडनेट, अशा योजना सामाजिक अंकेक्षण मार्फत ग्राम कवरदरी येथे रोजगार सेवक शेंदुलकर व गावांमधील सरपंच मयघने यांनी गावातील लोकांना माहिती दिली. या कार्यक्रमाला आमदार अमित झनक यांनी सुद्धा या कार्यक्रमाचा लाभ घेतला.



