महाराष्ट्र

गुरुकुल ज्ञानपीठ तेल्हारा येथील विद्यार्थ्यांची हॉलीबॉल स्पर्धे मधून जिल्हास्तरावर निवड!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी

तेल्हारा दि.१६ सप्टेंबर | तेल्हारा येथे गुरुवार दि.१२ सप्टेंबर २०२४ रोजी तालुकास्तरिय क्रिडा स्पर्धा झाल्या होत्या त्यामधील हॉलीबॉल ह्या स्पर्धे‌मध्ये गुरुकुल ज्ञानपीठ तेल्हाराच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व त्यांनी घवघवीत यश हि मिळविले.
त्यामध्ये १४ वर्षाखालील व १९ वर्षाखालील विद्यार्थ्यांची जिल्हा स्तरावर निवड झाली आहे. १४ वर्षाखालील विदयार्थी शिवम पदमने, मयंक अग्रवाल, अंशुमन यादव , लोकेश भाकरे , श्रवण काकड, समर्थ धरमकर, धीरज दिवनाले, कृष्णा कोगदे, वेदांत सरोदे, महेश फोकमारे, यर्थाथ बहाकर, प्रज्वल तायडे यांचा सहभाग आहे तर १९ वर्षा खालील विद्यार्थ्यांमध्ये सिद्धार्थ अभ्यंकर, गौरव खंडागडे, शेख अफजान, आरुष वानखडे, शिव ढोले, शोन गेबड , अनमोल खोटरे, सोहम दही, क्रिश रत्नपारखी, प्रतीक खुमकर, मयुर पदमने, मोहम्मद उमर यांचा सहभाग आहे.
या स्पर्धेमध्ये घवघवित यश मिळविल्या बद्दल गुरुकुल ज्ञापीठाचे अध्यक्ष कमल माहेश्वरी, सौ. अर्चना कमल माहेश्वरी, प्राचार्य किशोर देठे, मुख्याध्यापिका वर्षा पारसकर , क्रिडाशिक्षक जावेद शाह व ऋषिकेश भुजबले तसेच सर्व शिक्षकवृंदानी वि‌द्यार्थ्यांचे कौतूक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button