महाराष्ट्रविदर्भ

जि. प. प्राथमिक शाळा जउळका येथे दहीहंडी कार्यक्रम उत्साहात साजरा

” विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट प्रतिसाद “

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगाव :- मालेगाव तालुक्यातील जउळका रेल्वे येथिल जि. प. प्राथमिक शाळेमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त दहीहंडीचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण आणि राधाची वेशभूषा परिधान करत जन्माष्टमी उत्सवाचा आनंद लुटला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक राजु बळी सर उपस्थित होते.याप्रसंगी भगवान श्रीकृष्ण आणि दहीहंडी यांच्या प्रतिमांसह शाळेचे मैदान सुशोभीत करण्यात आले होते. शाळेचे मुख्याध्यापक राजु बळी ,अनिल सोळंके, ताराचंद वाघमारे यांच्या हस्ते भगवान श्रीकृष्ण यांच्या प्रतिमेचे व दहीहंडीचे पूजन करण्यात आले. शाळेतील सर्वच चिमुकल्या विद्यार्थ्यांनी राधा- कृष्णाच्या वेशभूषा परिधान केल्या होत्या. त्यामुळे संपूर्ण शाळा गोकुळमय झाली होती. श्रीकृष्णाचे चरित्र, श्रीकृष्णाची माहिती तसेच श्रीकृष्णाची रासलीला याविषयीची माहिती विद्यार्थ्यांना सांगण्यात आली. “गोविंदा रे गोपाळा…..” अशा अनेक जन्माष्टमी गाण्याच्या तालावर विद्यार्थी व शिक्षकाने नृत्य केले. यानंतर विद्यार्थ्यांना गोकुळाष्टमीचा प्रसाद वाटप करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापक राजु बळी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच शाळेतील शिक्षक प्रेमानंद डाखोरे, मन्मथ अब्दुलपुरे, सुरज अवचार, शिक्षिका शिल्पा कळस्कर, दिपाली इंगळे, सरोजिनी श्रीरामे तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button