मालेगांव येथे कावड यात्रा उत्साहात

कावड यात्रेत युवकांचा सहभाग-१०१ भरण्याची कावड
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगाव : – मालेगांव येथे दि २६ ऑगस्ट रोजी श्रावणातील चौथा सोमवारी मालेगांव येथे मोठ्या उत्साहात कावड यात्रा काढण्यात आली श्रावण महिन्यात यावर्षी नव्याने सुरू करण्यात आलेल्या कावड यात्रेला मालेगांव येथील तरुण मंडळीचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व श्रावण महिना असल्याने गावात धार्मिक वातावरण निर्माण झाले मालेगांव येथून औढा नागनाथ , चांडस , घुष्णेश्वर , ऋबंकेश्वर , तपोवन , परळी वैजनाथ , येथून जलाशयातील कावडीने पाणी आणून गावातील पुरातन शिव मंदिर येथे सोमवार रोजी सकाळी ७ जलाभिषेक करण्यात आला. आणि दुपारी १ नंतर कावडीच्या मिरवणूकीला जोगदंड दवाखाना पासून सुरूवात झाली दुर्गा चौक , जैन मंदिर , माळी वेटाळ , खवले वेटाळ , पांडे वेटाळ , तेली वेटाळ , शामबाबुजी मुंदडा (उदयोग पती ) यांच्या घरा समोरून , गांधी चौक येथे येवून आप आपल्या मार्गानी जावून कावड यात्रा विर्सजन करण्यात आली ग्रामस्थांनी ठिकठिकाणी कावडीची आरती ओवाळून पूजन केले. या कावड यात्रेला गावकऱ्यांनी व बाहेर गावावरून आलेल्या भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सोमवार दि. २६ ऑगस्टला कावड यात्रा मधील मुख्य मार्गावर काढण्यात आली तर महिला मंडळींनी घरासमोर पाणी शिंपडून व रांगोळी काढून कावड यात्रेचे स्वागत केले. परिसरातील
नागरिकांनी ही भव्य कावड यात्रा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. तर शेवटी कावड यात्रेची सांगता करण्यात आली. शिवभक्तांचा उत्साह आणि वाद्यांच्या गजरात ‘जय भोले’, ‘हर हर महादेवच्या जय घोषाने संपूर्ण परिसर दणाणले गेला होता या मिरवणुकी मध्ये ढवळेश्वर कावड मंडळ , संत सावता माळी कावड मंडळ , ओलांडेश्वर कावड मंडळ , योगेश्वर कावड मंडळ , शंभुराजे कावड मंडळ , शिवशंकर कावड मंडळ , गुणवंत सरकार कावड मंडळ भेरा दरबार ,महाकालेश्वर कावड मंडळ , कालभैरव कावड मंडळ व इत्यादी कावड मंडळांनी सहभाग घेतला होता कावड यात्रा मिरवणूकी शांततेत पार पाडला यावेळी ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.✍️



