शेगाव एसटी डेपो मॅनेजरवर गुन्हा दाखल

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
शेगाव, येथे वाहक महिलेला ड्युटी न देता सकाळ पासून दुपार पर्यंत ताटकळत बसवून ठेवण्यात आले. त्यानंतर याबाबत डेपो मॅनेजर यांची मागणी पूर्ण करा असे तिला तीन कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे डेपो मॅनेजर यांना भेटायला गेले असते त्यांनी हात धरून विनयभंग केल्याची तक्रार महिला वाहक यांनी शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये दिली.
यावरून पोलिसांनी डेपो मॅनेजर विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सदर घटना बुधवारी दुपारी एक वाजता शेगाव एसटी डेपो मध्ये घडली. याबाबत वाहक महिलेने पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीमध्ये नमूद केले आहे की, मी नेहमी प्रमाणे सकाळी ६.३० वाजता शेगाव बस डेपो येथे कर्तव्यावर आले. तेव्हा शेगाव ते खामगाव फेऱ्या करणारी
कर्तव्य क्रमाक १० नंबरची ड्युटी होती, परंतु सदर ड्युटीवर जाण्यासाठी गाडी उपलब्ध नसल्याने योगेश वांदे यांचे कार्यालयात बसुन होती. तेव्हा १२.३० वाजताच्या सुमारास योगेश वांदे, प्रदीप जुमडे आणि संतोष दिवनाले यांनी डेपो मॅनेजर यांची मागणी पूर्ण करा असे सांगितले. त्यामुळे मी डेपो मॅनेजर गोविंदा जवंजाळ यांचे कॅबीनमध्ये गेली असता त्यांनी हात पकडुन वाईट उद्देशाने बेंचवर बसवले. त्यामुळे मी घाबरुन गेली व त्यांना विचारले की, तुमची काय मागणी आहे. असे विचारताच ते सुध्दा घाबरले व नंतर बाथरुमकडे निघुन गेले. घटना घडली त्यावेळी तेथे कोणीच हजर नव्हते. अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्टवरून पोलिसांनी डेपो मॅनेजर गोविंदा जवंजाळ यांच्या विरूध्द गुन्हा नोंदवला आहे. सदर घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आयरे करत आहेत



