महाराष्ट्र

“रिसोड ते घोन्सर रस्त्याची दुरावस्था”

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

रिसोड : – रिसोड शहरानजीक असलेले व मराठवाडा विभागाशी जोडलेले घोन्सर छोटेसे गाव आहे. येथील लोकसंख्या कमी असल्याने लोकप्रतिनिधी जाणून-बुजून समस्यांकडे लक्ष देत नाहीत त्यामुळे हा रस्ता ग्रामीण रुग्णालय (रिसोड) ते घोन्सर इतका खराब झाला की त्या रस्त्याने चालणे किंवा चारचाकी वाहन व मोटरसायकल चालवणे सुद्धा कठीण झाले आहे. या रस्त्यावर ये-जा करत असतांना बऱ्याच लोकांना कमरेचे, मणक्याचे व मानेचे आजार जडले आहेत. त्यामुळे येथील नागरिक ये- जा करण्यासाठी त्रस्त झाले. या बाबीकडे कोणताही बांधकाम विभाग लक्ष द्यायला तयार नाही व लोकप्रतिनिधीनां मतदानासाठी मतदारांची संख्या कमी असल्याने तेही लक्ष देत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत या बाबीची निदान बांधकाम विभागाचे अधिकारी दखल घेऊन आपल्या कर्तव्यप्रती इमान -इतबारे लक्ष दिल्यास जनतेच्या समस्या सुटतील व समस्याग्रस्त असलेले नागरिकही कामे झाली तर अभिमानाने बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे आभारही मानतील.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button