विदर्भ

मालेगाव तालुक्यातील शिधा पत्रिका ई केवायसी चे सर्व्हर डाऊन…….

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगाव : – प्रत्येक शिधा पत्रिकाधारकांना ई केवायसी करणे बंधनकारक करण्यात आलेली असताना.
शिधापत्रिकेत नावे असलेल्या कुटुंबातीलसर्व सदस्यांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधितांना धान्य वितरणाचा लाभ मिळणार नाही असे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. त्याकरिता राशनकार्ड धारक आपले सर्व कुटुंब घेऊन ई केवायसी करण्यासाठी स्वस्त धान्य दुकानात येत आहे परंतु सतत काही दिवसापासून सर्वर डाऊन असल्यामुळे तांत्रिक अडचण दररोज येत आहेत विद्यार्थी,महिलावर्ग,शेतकरी, मजूरवर्ग,वयोवृद्ध नागरिक व कुटुंब प्रमुखांना स्वस्त धान्य दुकानासमोर बसून राहत असल्याचे चित्र दिसत आहे.
तासो-तास बसून पण ई केवायसी चे काम होत नसल्यामुळे संपूर्ण दिवस जात असल्याने ई केवायसी ही नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे दिसून येत आहे असे असताना स्वस्त धान्य दुकानदार व शिधापत्रिकाधारक अक्षरश: ताराबळ उडाली आहे.
त्यामुळे ई केवायसीचे सर्वर व तांत्रिक अडचणी ही दूर करणे गरजेचे आहे.

या संदर्भात मालेगाव (तहसील) पुरवठा विभागाने या महत्वाच्या बाबी कडे आपले लक्ष केंद्रित करून ई केवायसी सर्वर तसेच तांत्रिक अडचण तत्काळ दूर करावी
अशी मागणी मालेगाव तालुक्यातील नागरिक व सामाजिक कार्यकर्ते जावेद धन्नू भवानीवाले (मेडशी)यांच्याकडून होत आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button