महाराष्ट्र

संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे मालेगांव येथे जंगी स्वागत

:हजारो कार्यकर्त्यांची उपास्थिती

वाशिम जिल्हा प्रतीनीधी
अजय गायकवाड

मालेगाव :- मराठ्यांना आरक्षण मिळावे म्हणुन आपला प्राण पणाला लावणारे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे ६ जुलै रोजी हिंगोलीकडे जात असतांना मालेगांव शहरात जंगी स्वागत करण्यात आले . यावेळी तालुक्यातील हजारो कार्यकर्ते उपस्थीत होते .
मराठयांना ओबीसी आरक्षण मिळावे या मागणी साठी गेल्या अनेक वर्षापासुन आपल्या प्राणाची पर्वा न करता महाराष्ट्र शासनाला सळो की पळो करून सोडणारे मनोज जरांगे पाटील यांच्या मागे आज अख्या महाराष्ट्रातील मराठा बांधव संपूर्ण ताकतीनिशी उभे राहिले आहेत. येत्या 13 जुलै रोजी मुंबईकडे निघणाऱ्या मराठा मोर्चा साठी जिल्हा जिल्ह्यातून ते संघर्ष रॅल्या काढत असुन त्यासाठी ते उभा महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. आज ६ जुलै रोजी हिंगोली येथे त्यांची भव्य मराठा संघर्ष रॅली निघणार असून त्यासाठी ते छत्रपती संभाजीनगर कडून हिंगोली येथे जात असताना त्यांचे मालेगाव बायपासवर आगमन झाले . त्यांच्या स्वागतासाठी मालेगाव तालुक्यातील व शहरातील मराठा समाजातील हजारो कार्यकर्ते जमा झाले होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button