टेंभूर्णा येथे दोन ठिकाणी चोरी रोख रक्कमेसह महिलांच्या अंगावरील दागिणे हिसकले

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर शेगांव
खामगाव :- अकोला महामार्गावर असलेल्या टेंभूर्णा गावात काल रात्री ३ ते ३.३० नकाबपोश दरोडेखोरांनी तीन घरांमध्ये दरोडा टाकला. यामध्ये डॉ. प्रदीप टिकार यांचे वडील माणिकराव देवराव – टिकार व मातोश्री सौ. कमल या दोघांना दरोडेखोरांनी मारहाण करून त्यांच्या अंगावरील दागिणे तसेच श्री गजानन महाराजांच्या चांदीच्या पादुका चोरून नेल्या. याशिवाय चोरट्यांनी शंकर
मिनाजी लांडे व प्रभाकर वासुदेव टिकार यांच्या घरालाही निशाणा बनविला. शंकर लाड यांच्या घरातील कपाटातील रोख तसेच कुटुंबातील अंगावर असलेले सोन्याचे दागिणे असा १५ हजाराचा मुद्देमाल हिसकावून नेला. माणिकराव टिकार यांच्या घरातून ९९ हजार २०० रूपये रोख व दागिणे चोरून नेले. या घटनेमुळे टेंभूर्णा गावा भिती पसरली आहे. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी अज्ञात आरोपींविरूध्द गुन्हा दाखल केला आहे



