जे ई स्कूल मधील विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी (ए) श्रेणी मध्ये कृष्णाल सौंदळे राज्यात 25 वा तर देवश्री विकास पाटील ही राज्यात 74 व्या स्थानी

जे ई स्कूल मधील विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी (ए) श्रेणी मध्ये कृष्णाल सौंदळे राज्यात 25 वा तर देवश्री विकास पाटील ही राज्यात 74 व्या स्थानी :- सविस्तर वृत्त असे की एलिमेंट्री व इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल जाहीर झालेला असून त्यामध्ये जे.ई. स्कूल मुक्ताईनगर येथील एलिमेंट्री व इंटरमिजिएट परीक्षेत 98/%निकाल. इंटरमिजिएट मध्ये 35 विद्यार्थी अ श्रेणीत उत्तीर्ण झाले व एलिमेंट्री मध्ये 25 विद्यार्थी ए श्रेणीत आले, त्यात एलिमेंट्री मध्ये कृष्णल प्रमोद सौंदळे हा राज्यात 25 वा आला व कुमारी देवश्री विकास पाटील हि राज्यात 74 वी आली व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे प्राचार्य श्री. आर .पी .पाटील सर, उपप्राचार्य जे .जे.पाटील सर, पर्वेक्षक श्री. बऱ्हाटे सर, महाजन सर राठोड सर सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. परीक्षा प्रमुख श्री .एम. आर. सुरवाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच संस्थेचे चेअरमन आदरणीय सौ. रोहिणी ताई खेवलकर- खडसे व संस्थेचे सचिव आदरणीय श्री.सी.एस दादा चौधरी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.



