क्राईमजळगावा जिल्हा

संतोष बारसे यांच्या खून प्रकरणी मुख्य आरोपी अटक

भुसावळ- प्रतिनिधी | येथील संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांच्या खुनातील प्रमुख आरोपी करण पथरोड याला नाशिक पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

या संदर्भातील वृत्त असे की, परवा म्हणजेच २९ मे २०२४ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास भुसावलातील जुना सातारा परिसरातल्या मरिमाता मंदिराच्या समोर माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे यांच्यावर टोळक्याने अंधाधुंद गोळीबार केला होता. या या दोघांचा मृत्यू झाल्याने परिसर हादरला होता.या प्रकरणी माजी नगरसेवक राजू भागवत सुर्यवंशी, बंटी पथरोड, शिव पथरोड, विनोद चावरिया यांच्यासह ११ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. यातील विनोद चावरिया आणि राजू सुर्यवंशी यांना कालच पोलिसांनी गजाआड केले होते. तर, या गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी करण पथरोड याने घटना घडल्यानंतर नाशिक येथे पलायन केले होते. तो नाशिकमधील द्वारका परिसरात आला असता नाशिक पोलिसांच्या पथकाने त्याला शिताफीने अटक केली.करण पथरोड याला भुसावळ पोलिसांच्या सुपुर्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तर, दुसरीकडे या प्रकरणातील अन्य आरोपी राजू सुर्यवंशी व विनोद चावरिया यांना आज दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button