खानदेशजळगावा जिल्हा

मौजे आंबापाणी (यावल) येथील थोरपाणी आदिवासी पाड्यावर वादळामुळे घर कोसळून एकाच कुटुंबातील चौघांचे निधन झाले असता, खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी भेट दिली.

दि.२६ मे रोजी रात्री झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यामध्ये रावेर लोकसभा अंतर्गत यावल तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगेस लागून असलेल्या मौजे आंबापाणी या अतिदुर्गम भागातील गावाजवळील थोरपाणी आदिवासी पाड्यावर घर कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाच आदिवासी पावरा कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची अत्यंत दु:खद घटना घडली असता, आज भाजपा पदाधिकारी यांच्यासह सदर घटनास्थळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी भेट देऊन स्थानिकांकडून घटनेची माहिती घेतली तसेस या घटनेत सदरील पावरा कुटुंबातील ८ वर्षाचा मुलगा बचावला असून त्याची भेट घेत सांत्वन करून धीर दिला. तसेच पाड्यावर झालेल्या नुकसानीची पाहणी करून स्थानिक नागरिकांशी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी संवाद साधला.

सदर घटनेत पावरा कुटुंबातील नानसिंग गुला पावरा, सोनुबाई नानसिंग पावरा, रतीलाल नानसिंग पावरा व बालीबाई यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून संबंधित कुटुंबाला व नुकसानग्रस्त नागरिकांना शासनाकडून योग्यती भरीव मदत तत्काळ मिळावी यासाठी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी सोबत उपस्थित अधिकाऱ्यांना योग्यत्या सूचना केल्या.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button