गुन्हेगारी

माणुसकी गेली तरी कुठे? जळगाव जामोद येथील धक्कादायक घटना

माणुसकी गेली तरी कुठे? जळगाव जामोद येथील धक्कादायक घटना मालवाहत गाडीने दूर जातीला दिली धडक; दुचाकी चालकास बेवारस जंगलात फेकून दिले!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी
प्रकाश दांडगे ( जळगाव जामोद)

जळगाव जामोद: माणूस आज किती विकृत बुद्धीचा झाला हे जळगाव जामोद तालुक्यातील घटनेवरून पुन्हा अधोरेखित झाले आहे. आपल्या चार चाकी वाहनाने झालेल्या अपघातात गंभीर जखमी व्यक्तीला उपचारासाठी नेतो असे सांगून आरोपीने चक्क जंगलातील दरीत टाकून दिले.
उपचार न मिळाल्यामुळे सदर व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून आरोपीला कठोर शिक्षा घ्यावी अशी मागणी होत आहे. यासंदर्भात सविस्तर असे की, जळगाव जामोद तालुक्यातील मेंढा मारी येथील आदिवासी युवक मनसाराम छत्तर सिंग वासकले(२२) हा लग्नसमारंभाकरिता (ता.३०) भिंगार येथे गेला होता. लग्न समारंभ संपन्न झाल्यावर तो दुचाकी क्रमांक एम एच २८ ऎच ९१८९ ने संध्याकाळी आपल्या गावाकडे परत
येत असताना निमखेडी ते सुनगाव रस्त्यावर गोराडा धरणाजवळ मालवाहू पिक-अप क्रमांक २७ बी एक्स ५३२८ च्या चालकाने धरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून त्याच्या दुचाकीस धडक दिली. या अपघातास मनसाराम वासकले गंभीर जखमी झाला. घटनास्थळावर लोकांसक्षम जखमी मनसाराम यास उपचाराकरिता दवाखान्यात घेऊन जातो असे सांगून लोकांच्या मदतीने आरोपी मालवाहू चालक आणि स्वतःच्या वाहनांमध्ये जखमी व्यक्तीस बसवून घेऊन गेला. परंतु जखमीस उपचाराकरिता दवाखान्यात घेऊन न जाता बरामपुर रोडवरील शांतीलाल संस्था यांच्या वावरालगत मनसाराम वासकले यास गाडीतून ढकलून दिल्याचे अ मानवीय कृत्य केले. उपचार न मिळाल्यास त्याचा मृत्यू होऊ शकतो याची जाणीव असताना आरोपी मालवाहू चालकांनी जंगलातील निर्मनुष्य स्टडी त्याला टाकून देऊन पोवारा केला त्या दरम्यान गेल्या दोन दिवसापासून मनसाराम वास्कल हे तेथेच पडून होता. उपचारा अभावी त्याचा मृत्यू झाला होता. दरम्यान(ता.५) सकाळी बेपत्ता युवकाचा मृतदेह सापडला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टम करिता ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद येथे पाठवला. दरम्यान जेव्हा ही घटना घडली तेव्हा काही नागरिकांनी त्याचे आपल्या मोबाईल मध्ये चित्रण केले होते. तर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल झाला होता. त्यामुळे मालवाहू वाहन क्रमांकाच्या आधारे तपास करत ठाणेदार आनंद महाराज यांनी आपले तपास चक्र गतिमान करून एका तासाच्या आत मालवाहू पिक- अप क्रमांक २७ बिक्स५३८२ चा चालक आरोपी योगेश सोपान महाजन वय ४० वर्ष. रा. बोरसार ता. जि. यास अटक केली असून त्याच्याविरुद्ध कलम ३०४,३०१ भादवि सह कलम १३४/१८६ मोटर वाहन कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून आरोपीस कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे. जळगाव जामोद वरून मध्य प्रदेशात जाण्यासाठी सातपुडा पर्वतातून एक जवळचा मार्ग आहे. या मार्गावरून वाहने भरधाव वेगाने वाहत असल्याने अनेकदा भीषण अपघात होत आहेत. याकडे महाराष्ट्र व मध्य प्रदेश पोलिसांनी विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच जळगाव जामोद कडून बऱ्हाणपूर कडे जाणाऱ्या सातपुडा पर्वतातील रस्त्यावर एक वनविभागाची चौकी असून सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस, अन्न व औषध प्रशासन तसेच महसूल विभागाचे कर्मचारी दिवस राहत पहारा देतात. या ठिकाणी दोन्हीकडून येणाऱ्या वाहनांची कसून चौकशी होते. परंतु असे असले तरीही या जखमी युवकाला ज्या पिकप वाहनातून नेण्यात आले त्या वाहनांची नोंद पोलीस चौकीतील रजिस्टर मध्ये नाही. हे एक गंभीर बाब असून तेथे तैनात अधिकारी नेमके करतात तरी काय? असा प्रश्न येथे उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे या बोराळा धरण परिसरात झालेल्या अपघातातील गुन्ह्यांमध्ये या चेक पोस्टवरील कर्मचारी सुद्धा तेवढेच जबाबदार असल्याने त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्याची मागणी मृतक इसमाच्या नातेवाईकांनी केली आहे. ✍

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button