प्रभू श्रीराम नवमी निमित्त रावेर लोकसभा मतदार संघातील शोभयांत्रांमध्ये डॉ. केतकी ताई पाटील सहभागी

रावेर, फैजपूर, यावलच्या
शोभा यात्रेत जाऊन डॉ केतकी ताई पाटील यांनी दिल्यात शुभेच्छा
जळगाव -रघुपति राघव राजाराम,
पतित पावन सिताराम….!
मलकापूर – पाचशे वर्षाच्या पारतंत्र्यानंतर प्रभू श्रीराम त्यांच्या मूळ जन्मस्थानी विराजमान झालेली ही पहिलीच राम नवमी… हा आनंद पूर्ण देशात द्विगुणित होत असून भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ केतकी ताई पाटील ह्यांनी देखील रावेर, फैजपूर, यावल, मलकापूर येथील मिरवणुकांमध्ये सहभागी होऊन श्रीराम नवमीच्या शुभेच्छा दिल्यात.
सर्वप्रथम भातृ मंडळ, मलकापूर येथील श्रीराम नवमी महोत्सवास गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका तथा भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर केतकीताई पाटील यांनी दर्शन घेतले. तद्नंतर
श्रीराम नवमीच्या निमित्ताने श्री राम नवमी उत्सव समिती, रावेर. यांच्या वतीने काढण्यात आलेल्या शोभायात्रेचे डॉ केतकी ताई पाटील यांनी पूजन केले, आणि सर्व राम भक्तांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन,शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख प्रल्हाद महाजन,उत्सव समितीचे अध्यक्ष अजिंक्य वाणी, उपाध्यक्ष रवींद्र महाजन, सचिव अभिषेक लोणारी, संतोष ठोके वाले,व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अरुण शिंदे आदी मान्यवरांची आणि राम भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. तसेच फैजपूर शहरातील श्रीराम जन्मोत्सव समितीच्या शोभायात्रे उपस्थिती देऊन, श्रीराम प्रभूंचे पूजन केले.
यावेळी समितीचे अध्यक्ष रितेश चौधरी, खजिनदार नीरज झोपे, सचिव हेमंत चुराने, भावेश चौधरी,जयेश कोल्हे, कल्पेश खत्री यांच्यासह राम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्या नंतर यावल येथील मिरवणुकीत डॉ केतकी ताई पाटील सहभागी झाल्या असून पुजन केले, तसेच संपूर्ण मिरवणुकीत वेगवेगळे देखावे बघीतले. तसेच ग्रामस्थांशी संवाद साधला, राम नवमीच्या शुभेच्छा दिल्यात.
यावंल येथे या शोभायात्रेच्या वेळी यावलचे भाजपाचे नूतन शहराध्यक्ष राहुल बारी,भाजपाचे माजी शहराध्यक्ष पुंडलिक दादा बारी, प्राचीताई पाठक, रितेश बारी, योगेश चौधरी,भूषण भेगडे कोमल इंगळे,किशोरजी कुलकर्णी, महेश खोचणे, शामशास्त्रीजी महाराज, किशोर महाजन आदींची उपस्थिती होती.
या शोभायात्रेत यावल व यावल परिसरातील रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.



