क्राईमगुन्हेगारीजळगावा जिल्हा

सोन्याची अंगठी चोरणाऱ्या चोरट्याला अटक

जळगाव स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

| १५ एप्रिल २०२४ वरणगाव शहरातील अष्टभुजा माता मंदिरा जवळून एका वृद्धाची ३० हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी चोरी झाल्याची घटना ९ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता घडली होती. याप्रकरणी वरणगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपी डिगंबर कौतिक मानकर रा. मोहन टॉकीज, जळगाव याला आसोदा रोड येथून रविवारी १४ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, वरणगाव शहरातील शिवाजीनगरातील रहिवासी भास्कर लोटन बाविस्कर वय- 79 हे आपल्या परिवारासह वास्तव्यात आहे. मंगळवार 9 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता ते वरणगाव शहरातील अष्टभुजा माता मंदिराच्या जवळ आलेले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या जवळील 30 हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी चोरून दिली. ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी अंगठीचा सर्वत्र शोध घेतला, परंतु त्यांना कोणतेही माहिती मिळाली नाही. याप्रकरणी अखेर १२ एप्रिल रोजी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या गुन्ह्यातील संशयित आरोपी हा जळगाव शहरातील असल्याचे माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी पथकाला रवाना केली. त्यानुसार रविवारी १४ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता संशयित आरोपी डिगंबर कौतिक मानकर रा. मोहन टॉकीज, जळगाव याला याला आसोदा रोड येथून अटक केली. त्याने गुन्ह्याती कबुली दिली. पुढील कारवाईसाठी त्याला वरणगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील, पोहेकॉ सुधाकर आंभोरे, महेश महाजन, विजय महाजन, लक्ष्मण पाटील, राहूल पाटील, अकरम शेख, किरण चौधरी, रणजी जाधव यांनी केली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button