महाराष्ट्र

एरंडोली गावचे माजी सैनिक विजय इथापे यांचे अपघाताने दुर्दैवी निधन

लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील एरंडोली गावचे माजी सैनिक विजय राजाराम इथापे वय 52 यांचे मंगळवारी 31 डिसेंबर रोजी सकाळी ट्रॅक्टर अपघातात दुर्दैवी निधन झाले. कै. विजय इथापे यांनी भारतीय सेना दलात सुभेदार पदावर जवळपास 32 वर्षे सेवा केली होती. ते तीन महिन्यापूर्वी नुकतेच सेवेतून निवृत्त झाले होते. सेवानिवृत्तीनंतर शेती उद्योगाला वैभव प्राप्त करून देण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्या पार्श्वभूमीवर  त्यांनी आधुनिक पद्धतीने शेती सुधारण्यासाठी स्वतःला झोकून घेतले होते. परंतु दुर्दैवाने त्यांचे अपघाती निधन झाल्याने त्यांचे शेती उद्योगाचे स्वप्न अधुरे राहिले. त्यांनी शेती सुधारण्यासाठी काही महिन्यापूर्वीच नवीन ट्रॅक्टर खरेदी केला होता. त्यातून ते स्वतः ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीची मशागत करत होते. मंगळवारी सकाळी ९ वाजता शेतामध्ये स्वतः ट्रॅक्टर चालवत शेती करत असताना बांधावरून वळण घेत असताना अचानक ट्रॅक्टर पलटी झाल्याने मेजर विजय इथापे हे ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडले. त्यात ते गंभीररित्या जखमी झाले होते. अपघाताची कुटुंबीयांना ही माहिती मिळताच त्यांनी तातडीने बेलवंडी येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले परंतु त्यांची प्रकृती आणखीच खालवली गेली होती डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना नगर येथील खाजगी दवाखान्यात घेऊन जात असतानाच त्यांचे वाटेतच निधन झाले या आकस्मित निधनाने इथापे कुटुंबा सह एरंडोली गावावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला गेला आहे

 मेजर कै विजय इथापे यांनी सेवेत प्रारंभ होण्यापूर्वी नाशिक येथे प्रशिक्षण घेतले त्यानंतर त्यांनी सेनादलात कार्यरत असताना जोधपुर लेहलडाख जम्मू काश्मिर पठाणकोट इत्यादी ठिकाणी आपले प्रामाणिकपणे कर्तव्य बजावले मेजर इथापे हे अत्यंत शांत मनमिळावू मितभाषी स्वभावाचे होते मेजर इथापे यांच्या निधनानंतर अहिल्यानगर येथील शासकीय रुग्णालयात शवाविच्छेदन करून त्यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात सपूर्द करण्यात आला यावेळी त्यांच्या कुटुंबीयांनी मोठा हंबरडा फडला होता मंगळवारी सायंकाळी सहा वाजता एरंडोली येथील राहत्या वस्तीवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता त्यांच्या पक्षात पत्नी आई-वडील एक मुलगा एक मुलगी एक भाऊ भाऊजई पुतणे असा परिवार आहे कै. मेजर विजय इथापे यांच्या आकस्मित निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ते छत्रपती संभाजी विद्यालयाचे उपशिक्षक संभाजी इथापे यांचे बंधू होत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button