खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगरसामाजिक

सांची महिला मंडळाच्यावतीने रमाई आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन सभा संपन्न

जळगाव – रमाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने सांची महिला मंडळाच्यावतीने संभाजी नगरातील झाकीर हुसेन कॉलनीत अभिवादन सभा सभेचे आयोजन करण्यात आले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे होते . व्यासपीठावर प्रमुख अतिथी छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे , बि.जि. बोदडे , सुभाष साळुंखे यांच्यासह आयोजक सांची महिला मंडळाच्या अध्यक्षा सुजाता इंगळे या होत्या . कार्यक्रमाच्या प्रारंभी बुद्धवंदना करून त्रिसरण पंचशील घेण्यात आले व उपस्थित मान्यवर प्रमुख अतिथींच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . आपल्या अध्यक्षीय भाषणात मुकुंद सपकाळे यांनी रमाई आंबेडकर यांच्या जिवन संघर्षावर व प्रकाश टाकत त्यांच्या व बाबासाहेबांच्या अनेक आठवणी सांगितल्या . तसेच रमाईंचा त्याग स्त्रियांसाठी प्रेरणादायी असुन समस्त समाज त्यांच्या ऋणात आहे असे प्रतिपादन त्यांनी केले . ग्रामसेवक शिरतुरे आप्पा यांनीही मनोगत व मिराबाई बाविस्कर , सपना तायडे यांनीही याप्रसंगी मनोगत व्यक्त केले . याप्रसंगी परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष गायकवाड यांनी तर आभार प्रदर्शन रमेश सोनवणे यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साची महिला मंडळाच्या कुसुम सोनवणे , माया मोरे , वैशाली सुरवाडे , रेखा भालेराव , रंजना सुरदास , शीला सुरवाडे , आशा सोनवणे , प्रज्ञा जाधव यांनी परिश्रम घेतले .

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button