बुलढाणामहाराष्ट्र

हातनी चिखली बुलढाणा रोडवर भीषण अपघात, दुचाकीची समोरासमोर धडक . दोघांचा जागीच मृत्यू .

: स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी : प्रशांत चव्हाण

चिखली :- हातनी चिखली -बुलढाणा रोडवर शुक्रवारी ( दि.७) संध्याकाळी ७:३० वाजेच्या सुमारास भीषण अपघात घडून दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे,
मिळालेल्या माहितीनुसार मोसंबेवाडी ता. जानेफळ येथील रहिवासी दत्तात्रय वाघ (वय ३४) हे आपल्या दुचाकीने जात असताना. हातनी चिखली बुलढाणा रोडवर समोर येणाऱ्या दुसऱ्या दुचाकी लां जोरदार धडक झाली . या भीषण अपघातात दत्तात्रय वाघ यांच्यासह दुसऱ्या दुचाकी वरील तेलरकर (रा.बुलढाणा) यांचा जागीच मृत्यू झाला. सुमित हे वरुड नाका येथील बँकेच्या शाखेत कर्मचारी म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.
हा अपघात इतका भीषण होता की. दोन्हीही दुचाकीचा अक्षरशा चुरडा झाला . घटनास्थळी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील कारवाई चालू केली आहे. या अपघातामुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत असून मृतांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button