अखेर पोपटखेड प्रकल्पामध्ये बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेणाऱ्या बचाव पथकाला मिळाले यश.

*परंतु गाळात फसल्यामुळे संदीप दामोदर राऊत यांचा मृत्यू!*स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी दि. १७ : प्रसिद्ध असलेल्या अकोट तालुक्यातील पोपटखेड प्रकल्पामध्ये दि.१५/०३/२०२४ रोजी मौजे सावरा ता.अकोट येथील रहीवाशी असलेले संदीप दामोदर राऊत (३६) वर्ष , हे पोपटखेड धरणाचे रुधाडी पुलाचे भागामध्ये पाण्यामध्ये बुडाले होते .शुक्रवार दि.१५ मार्च २०२४ रोजी पोपटखेड येथील वीर एकलव्य आपात्कालिन बचाव पथक यांनी तात्काळ घटनास्थळावर जाऊन शोध कार्य केले परंतु संध्याकाळपर्यंत शोध लागला नव्हता. त्यानुसार मा.जिल्हाधिकारी यांचे निर्देशानुसार व उपविभागीय अधिकारी अकोट तसेच तहसीलदार अकोट यांचे मार्गदर्शनामध्ये काल दि.१६ मार्च २०२४ रोजी जिल्हा शोध व बचाव पथक , वंदे मातरम् आपत्कालिन पथक , वीर एकलव्य पथक यांनी बोट व शोध बचाव साहीत्यासह पोपटखेड प्रकल्प येथे दाखल होऊन सकाळी सहा वाजता पासुण शोध कार्यस सुरुवात केली. तब्बल चार तासाच्या अथक प्रयत्नाने अखेर गाळामध्ये फसलेला संदीप दामोदर राऊत यांचा मृतदेह बोटमधुन लोखंडी गळाचे माध्यमातुन धरणाचे बाहेर काढण्यात आला . यामुळे बचाव पथकाला मोठे यश मिळाले आहे असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही , परंतु पाण्यातील गाळात संदीप दामोदर राऊत हे फसले असल्यामुळे त्यांचा यामध्ये मृत्यू झाला अशी जनमानसात चर्चा आहे हे अत्यंत दुःखद बाब आहे. या घटनेमुळे सर्वत्र शोककळा पसरलेली आहे असे दिसून येते. यावेळी शोध व बचाव पथकाचे सुनिल कल्ले ,वंदे मातरम् आपत्कालिन पथक कुरणखेडचे उमेश आटोटे, मनिष मेश्राम, प्रदीप मोहोड , अकोट ग्रामीण चे ठाणेदार जूनघरे साहेब, पि.ए.आय. विष्णु बोडखे, जमादार सोनोने , पोपटखेड येथील तलाठी यांचा या शोध कार्यात सक्रिय सहभाग होता



