बुलढाणा

घाटपुरी ग्रामपंचायत वर भाजपाचे विष्णु परमेश्व़र कुळसुंदर (पाटील) सरपंचघाटपुरीच्या इतिहासात सर्वात तरुण सरपंच

घाटपुरी ग्रामपंचायत वर भाजपाचे विष्णु परमेश्व़र कुळसुंदर (पाटील) सरपंचघाटपुरीच्या इतिहासात सर्वात तरुण सरपंच स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठेघाटपुरी ग्रामपंचायत सरपंच पदाची निवडणुक काल दि.15 सप्टेंबर 2023 रोजी पार पडली यावेळी भाजपाचे विष्णु परमेश्व़र कुळसुंदर(पाटील) यांची बहुमताने निवड करण्यात आली यावेळी खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड आकाशदादा फुंडकर यांनी त्यांचा पुष्प़हार घालुन सत्कार केला. खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड आकाशदादा फुंडकर यांच्या नेतृत्वात खामगांव विधानसभा मतदारसंघात चौफेर समग्र विकास सुरु आहे. घाटपुरी ग्रामपंचायत मध्ये कधी नव्हे एवढी विकास कामे झाली असून कोटयावधी रुपयांची कामे सुरु आहे. घाटपुरी ही एक विकसीत ग्रामपंचायत म्हणून नावारुपाला आली आहे. काल पार पडलेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत आमदार ॲड आकाशदादा फुंडकर यांच्या मार्गदर्शनात विष्णु परमेश्व़र कुळसुंदर(पाटील) यांची बहुमताने निवड करण्यात आली. एकुण 17 पैकी 11 मते विष्णु कुळसुंदर यांना मिळाली असून विरोधातील सौ धुरंधर यांना 6 मते मिळाली आहेत. यावेळी उपसरपंच योगेश कोल्हे, ग्रामपंचायत सदस्य़ गोपाल महारखेडे, विशाल झनके, आकाश कुलट, सौ.संगिता ढोले, सौ.अलका दळवी, सौ सपना तायडे, सौ.वैशाली जाधव, सौ.वंदना दुतोंडे, सौ जया टोपरे, हे ग्रामपंचायत सदस्य़ सहभागी झाले होते. यावेळी भाजपाचे शरदचंद्र गायकी, संजय शिनगारे, विनोद टिकार, सुनिल वानखडे, मुन्ना दळवी, गोपाल ढोले, विजय महाले, निखील तायडे, मंगेश टोपरे, मुन्ना जाधव, शिवहरी कोल्हे, भगवान दुतोंडे, दिपक कुलट, याचेसह गावकरी उपस्थ‍ित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button