बुलढाणा
महावितरण च्या भोंगळ कारभारामुळे एका निष्पाप शेतकऱ्याला आपला जीव गमावल्याची धक्कादायक घटना

महावितरण च्या भोंगळ कारभारामुळे एका निष्पाप शेतकऱ्याला आपला जीव गमावल्याची धक्कादायक घटना खामगाव तालुक्यातील पिंप्राळा गावात 15 जुन च्या रात्री 9.30 वाजताच्या दरम्यान घडली आहे. श्रीधर दयाराम पटोकार ( वय 41वर्ष रा.पिंप्राळा. खामगाव.) असे मृत्यू झाल्याचे शेतकऱ्याचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार श्रीधर पटोकार 15 जूनच्या रात्री आपल्या शेतामध्ये ट्रॅक्टरने रोटावेटर मारत होते. याचवेळी शेतातून गेलेल्या लाईनच्या विद्युत तारा शेतामध्ये लोबंकळत पडलेल्या होत्या . तिथून ट्रॅक्टर जात असताना विजेच्या तारेचा स्पर्श ट्रॅक्टरला होवुन श्रीधर पटोकार यांना विजेचा शॉक लागला. यामुळें त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.श्रीधर पटोकार याच्या मागे दोन मुली व पत्नी असा परीवार आहे.



