जऊळका रेल्वे स्थानकावर रात्रीच्या पॅसेंजर गाडीचा थांबा सुरू करण्यासाठी विधान परिषद आमदार मा.भावना गवळी यांना निवेदन…

वाशिम (अजय गायकवाड )
मालेगाव : – तालुक्यातील जऊळका रेल्वे स्थानकावर कोरोना काळापासून बंद असलेल्या रात्रीच्या पॅसेंजर गाड्यांचा थांबा पूर्ववत सुरू करण्यासाठी जऊळका ग्रामस्थ व व्यापारी वर्गाने विधान परिषद आमदार माननीय भावनाताई गवळी यांच्याकडे निवेदन सादर केले निवेदन सादर करणारे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सदस्य विवेक उर्फ लालाजी चव्हाण यांनी यावेळी जऊळका रेल्वे स्थानकाचे महत्त्व अधोरेखित करताना स्थानिक समस्या मांडल्या त्यांनी नमूद केले की,जऊळका रेल्वे स्थानक मालेगाव तालुक्यातील ४५ खेड्यांचे केंद्रबिंदू असून,नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग या ठिकाणापासून अवघ्या १ किलोमीटर अंतरावर आहे या भागातील व्यापारी,शेतकरी,विद्यार्थी व सामान्य नागरिकांसाठी रेल्वे स्थानक महत्वाचे ठिकाण आहे निवेदनात पुढे नमूद करण्यात आले की,पूर्णा-अकोला रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले असून जऊळका स्थानकावर ३२ केव्ही विद्युत सबस्टेशन कार्यान्वित आहे मात्र,सध्या सकाळच्या काही पॅसेंजर गाड्यांचा थांबा असला तरी,रात्रीच्या पॅसेंजर गाड्यांचा थांबा बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे रेल्वे स्थानकावर कॅन्टीनसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव आहे परिणामी,प्रवाशांना लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी अकोला किंवा वाशिम येथे मुक्काम करावा लागत आहे ग्रामस्थांनी मागणी केली की,लांब पल्ल्याच्या व पॅसेंजर गाड्यांचा थांबा पूर्ववत सुरू करून रेल्वे स्थानकावर मालधक्का उभारला जावा यामुळे व्यापारी,शेतकरी व विद्यार्थी वर्गाला दिलासा मिळेल विधान परिषद आमदार भावनाताई गवळी यांनी याबाबत तात्काळ संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले त्यांनी याबाबत योग्य तो निर्णय होईल,असे सांगून नागरिकांना सहकार्याचे आश्वासन दिले.



