महाराष्ट्रसामाजिक

रोगनिदान शिबिरास उत्स्फूर्त*प्रतिसाद’

*‘* पातुर तालुका प्रतिनिधी सुखलाल उपर्वट शिर्ला (अंधारे) (५ एप्रिल) येथील श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालयात स्व. गोविंदराव अंधारे यांचे स्मृतिप्रित्यर्थ आयोजित भव्य रोग निदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांनी स्व. गोविंदरावजी अंधारे यांच्या स्मारकास अभिवादन केले त्यानंतर प्रतिमापूजन व मान्यवरांचे स्वागतानंतर महाविद्यालयाचे संचालक कृष्णा अंधारे यांनी आपल्या मनोगतामध्ये स्व. गोविंदराव अंधारे यांचे आठवणींना उजाळा दिला व शिबिराची पार्श्वभूमी विषद केल्यानंतर अकोला येथील सुप्रसिद्ध मान्यवर डॉ. श्रीकांत काळे, डॉ. प्रणय महल्ले, डॉ. शिवाजी ठाकरे, डॉ. आशिष टाले, डॉ. योगेश वर्गे, डॉ. निलेश वानखडे, डॉ. दिपाली काळे यांनी रुग्ण तपासणी केली 270 रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला विशेषत: येथील श्री सोमपुरी महाराज जेष्ठ नागरिक संघाचे बहुसंख्य सदस्यांनी आपली आरोग्य तपासणी करून शिबिराचा लाभ घेतला ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नारायण अंधारे महाविद्यालयाचे संचालक कृष्णा अंधारे, हेमलता अंधारे, प्राचार्य डॉ. राम खर्डे, जगदीश मुरूमकार, डॉ.शेंडे, आयुर्वेदिक महाविद्यालयाचे डॉ. दिलीप अतकर, डॉ. सुनिता कदम, डॉ. सोनाली महाजन, प्रा. विलास राऊत तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष देवानंद गहिले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. तर प्रमुख ग्रामस्थांमध्ये वीरपिता काशीराम निमकंडे, निळकंठराव अंधारे, दत्तात्रय अंधारे, ह.भ.प. राजू महाराज कोकाटे, सुनील अंधारे, विश्वंभर अंधारे, रामकृष्ण खंडारे, रामदास सावरकर, देविदास निमकंडे, रमेश वरणकर, जनार्दन इंगळे, प्रा. रघुनाथ अंधारे, सखाराम अंधारे, अनंत अंधारे, अंधारे परिवार व ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती. शिबिराचे यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. राम खर्डे, प्रा. शैलेश दवणे, प्रा.पंकज देशमुख, प्रा‌ पांडुरंग जाधव, प्रा. शिवकुमार राठोड, प्रा. सौरभ वर्मा, प्रा.सागर भगत, श्रीकृष्ण आवटे, नितीन वाकोडे, सौ. देशपांडे, प्रितेश मंजुळकर यांनी प्रयत्न केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button