रिसोडमध्ये अल्पवयीन मुलीवर तिघांने केला बलात्कार

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
रिसोडः – शहरा पासून जवळच असलेल्या मुंगसाजी नगर येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून बलात्कार केल्याची घटना २१ ऑगस्ट २०२४ रोजी घडली. बदलापूर अत्याचाराची ताजी घटना असतांना जिल्हयात घडलेल्या घटनेमुळे बदलापूर घटनेची पुरानावृत्ती झाल्याचे दिसत आहे.
पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार रिसोड शहरा पासून जवळच असलेल्या मुंगसाजी नगर येथील एका १३ वर्ष ९ महिने वय असलेल्या अल्पवयीन मुलीवर त्याच भागातील तिघांनी अत्याचार करून बलात्कार केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली असून पोलीस प्रशासनाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अत्याचारग्रस्त अल्पवयीन मुलगी आपल्या घराबाहेर २० ऑगस्ट २०२४ रोजी उभी असताना
पंढरी फुफाटे यांनी माझ्यावर रात्रभर अत्याचार करून बलात्कार केल्याचे तक्रारीत अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. २१ ऑगस्ट २०२४ ला घरी परतल्यानंतर अल्पवयीन मुलीने घडलेला सर्व प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. सदर घटनेची तक्रार देण्यासाठी अत्याचार ग्रस्त अल्पवयीन मुलीच्या आई-
जिल्हयात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले
मुंगसाजी नगर येथील गणेश फुफाटे,
सूर्यभान फुफाटे, पंढरी फुफाटे हे तिच्या जवळ आले व तीला पंढरी फुफाटे यांनी उचलले व मुंगसाजी पासून जवळच असलेल्या टेकडीवर असलेल्या झोपडीत नेले वत्यांच्या मागोमाग गणेश फुफाटे व सूर्यभान फुफाटे हे सुद्धा आले.
वडिलांनी रिसोड पोलीस स्टेशन गाठून रितसर तक्रार दाखल केली असता रिसोड पोलिसांनी अपराध नंबर ३९५/२०२४ कलम १३७(२), ३(५) भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये गुन्हा दाखल केला असून तिनही आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक केली. अत्याचार ग्रस्त मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविले असता तिच्यावर बलात्कार झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाल्याने सदर गुन्ह्यात कलम ६४ (२) (आय), ६५(१) भारतीय न्याय संहिता २०२३ तसेच सहकलम ४,५ (एन)६,८,१२ पोक्सो अधिनियम या कलमाची वाढ करण्यात आली आहे.
जिल्हयात अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत असून
तपास रिसोड पोलीस ठाण्याचे ठाणेदार भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गटे, पोलीस कर्मचारी सुशील इंगळे रुपेश मस्के गणेश जाधव व रिसोड पोलीस करीत आहेत. पोलीस प्रशासनाच्या कार्यशालीवर प्रश्नचिन्ह
रिसोड शहरात अनेक प्रकारच्या घटना घडत असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रिसोड शहरासह तालुक्यात या अगोदर अनेक प्रकारच्या घटना घडल्या असून त्या सर्व घटनांचा तपास लावण्यासाठी पोलीस प्रशासन अपयशी ठरल्याचे सर्वसामान्य जनतेत बोलल्या जात आहे.
समाजकंटक व गुन्हेगारांना कायद्याचा कोणताही धाक राहत नसल्याने पोलीस प्रशासनाला कायद्याचा विसर पडला की काय अशी शंका सर्वसामान्य नागरिक वर्तवित याकडे पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे बोलल्या जात आहे. नुकतीच मालेगाव शहरात एका शाळकरी मुलीचा विनयभंग करण्याची घटना घडली. या घटनेतील आरोपीने यापुर्वीही सदर अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला होता. तर रिसोड शहरातील आरोपी याने देखिल यापुर्वी असे कृत्य केल्याचे सांगितल्या जाते.
आहेत. बदलापूर घटनेची पुनरावृत्ती रिसोड शहरात झाल्याने महिला भयभीत झाल्या आहेत. बदलापूर अत्याचाराची घटना ताजी असतानाच मुंगसाजी नगर येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून बलात्कार केल्याची घटना घडल्याने महिलांसह मुली भयभीत झाल्या असून पोलीस प्रशासन कायदा सुव्यवस्थेचा वापर योग्य पद्धतीने करत नसल्यानेच अशा घटना घडत असल्याचा आरोप सर्वसामान्य नागरिक करीत आहेत. मुंगसाजी नगर प्रकरणातील तो आरोपी अटल गुन्हेगार या प्रकरणातील मुख्य असलेला पंढरी फुफाटे हा आरोपी अपराध क्रमांक २२६/२०२३ ३७६, (३) ३७६ए बी ३७७ पोक्सो मधील कलम गुन्ह्यात फरार होता हा अटल गुन्हेगाराअसून आरोपीवर पोलीस प्रशासनाच्यावतीने याअगोदर योग्य ती कारवाई केली असती तर ही घटना घडलीच नसती असे जनतेत बोलल्या जात आहे. संबंधित आरोपीवर पोलीस प्रशासनाच्या वतीने या अगोदर योग्य ती कारवाई न केल्याने त्याचे मनोबल वाढले आणि अल्पवयीन मुलगी त्याची शिकार बनली असल्याचे जनतेत नतेत चर्चा केली जात आहे.



