बुलढाणामहाराष्ट्रसामाजिक

“दहिगांव” प्रकरणात पो.नि. उलेमाले यांचे तेल्हारा तालुक्यातील नागरिकांना आवाहन !

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे, जिल्हा प्रतिनिधी अकोला

दहिगांव /तेल्हारा |


भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिना निमित्त तेल्हारा तालुक्यातील ग्राम. दहिगांव येथे घडलेल्या घटनेबाबत सर्वत्र तणावाचे वातावरण निर्माण झाले होते त्या संदर्भात दिनांक १८.०४.२०२५ रोजी ग्राम. दहीगांव ता. तेल्हारा येथे मा. सहायक पोलिस अधिक्षक श्री.अनमोल मित्तल साहेब. उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय अकोट यांचे मार्गदर्शनाखाली दहिगांव मध्ये १९/३० वा रूट मार्च घेण्यात आला, याप्रसंगी रूट मार्च मध्ये श्री अनमोल मित्तल सहायक पोलिस अधिक्षक साहेब. उप.विभागीय पोलिस अधिकारी कार्यालय अकोट, पो.नि.प्रमोद उलेमाले ठाने प्रभारी तेल्हारा, स्थानिक पोलिस अमलदार तसेच आर.सि.पी. चे प्लाटुन हजर होते. तरी दहिगांव घटनेची संदर्भात तेल्हारा शहर व तालुक्यातील समस्त नागरीकांना आवाहन करण्यात येते कि, तेल्हारा पोलीस आपली कायदेशीर कारवाई करीत असुन कोणीही कायदा हातात घेवुन गैरवर्तन करु नये तसेच कोणीही अफवांवर विश्वास ठेवु नये तसेच कोणत्याही प्रकारची भिती न बाळगता आपले दैनंदिन कर्तव्य करावे असे आवाहन तेल्हारा तालुक्यातील समस्त नागरीकांना पोलीस निरीक्षक प्रमोद उलेमाळे पोलीस स्टेशन तेल्हारा यांचे कडून करण्यात येत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button