जळगावा जिल्हामहाराष्ट्ररावेर

येथील रावेर शिक्षण संवर्धक संघ ,रावेर येथे संस्थेच्या शताब्दी पूर्ती महोत्सवाला आज सुरुवात झाली

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
रावेर ता. प्रतिनिधी :-विकास आमोदकर

.या निमित्ताने संस्थेच्या सर्व सभासदांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष रावेर शिक्षण संवर्धक संघाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ सभासद डॉ.श्री. एम. बी. वाणी हे होते तसेच व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष श्री .देवेंद्र मिसर, उपाध्यक्ष श्री .राजेंद्र आठवले ,चेअरमन श्री. संतोष शेठ अग्रवाल ,संस्थेचे पदसिद्ध सदस्य श्री .राजेंद्र अग्रवाल तसेच ज्येष्ठ सभासद श्री. गोपाल धनु पाटील ,श्री .प्रकाश जोशी, श्री रमेश जहागीरदार श्री .पांडुरंग टीकाराम पाटील, डॉ. श्री . पी.टी. पाटील ,माजी चेअरमन विजय अग्रलवाल .विलास विखे ,श्री माजी

अध्यक्ष .अ .वि .रावेरकर, श्री. एस .बी. महाजन ,श्री. मधुकर नथू पाटील, श्री. आर. एन .पाटील ,श्रीमती कुसुमताई उपाध्ये श्री सतीश वाणी श्री सुरेश लोहार आदी जेष्ठ सभासद उपस्थित होते. जमलेल्या सर्व सभासदांचा स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र आठवले यांनी आपल्या प्रास्ताविकातून संस्थेच्या स्थापनेपासूनचा इतिहास व माहिती उपस्थित सभासदांना सांगितली तर संस्थेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक श्री. शितल पाटील यांनी गेल्या वर्षभरातील कार्याचा आढावा सभासदांना दिला. पुढील काळात शताब्दी महोत्सवाशी संबंधित कार्यक्रमांची माहिती विद्यमान चेअरमन श्री. संतोष शेठ अग्रवाल यांनी दिली .

या निमित्ताने सरदार जी .जी .माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री .आर .आर. पाटील व सौ. के .एस. ए .गर्ल्स हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ .पी .जे. कुलकर्णी यांचा देखील सेवानिवृत्तीच्या निमित्ताने सत्कार करण्यात आला. शताब्दी पूर्ती महोत्सवाच्या निमित्ताने अनेक सभासदांनी देणगी जाहीर करून मनोगतही व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रावेर शिक्षण संवर्धक संघाचे अध्यक्ष श्री .देवेंद्र मिसर, उपाध्यक्ष डॉ राजेंद्र आठवले, चेअरमन संतोष शेठ अग्रवाल ,सचिव श्री अक्षय अग्रवाल ,संस्थेचे संचालक डॉ.श्री दत्तप्रसाद दलाल, श्री शैलेंद्र कुमार देशमुख ,श्री शितल पाटील ,श्री महेश अत्रे श्री तुषार मानकर उज्वल अग्रवाल, ,श्री .विजयलाल लोहार यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या वेळी रावेर शिक्षण संवर्धक संघाचे सभासद व सरदार जी. जी. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तसेच सौ. के. एस .ए .गर्ल्स हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व पदाधिकारी ,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका सौ.क्रांती नाईक यांनी केले तर आभार उपशिक्षक श्री. पी .एन. पाटील यांनी मानले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button