बुलढाणामहाराष्ट्र

स्व.भाई के आर पाटील यांची जन्मभुमी असलेल्या करमोळा येथे जयंती साजरी..

स्व.भाई के आर पाटील यांची जन्मभुमी असलेल्या करमोळा येथे जयंती साजरी..

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव

प्रतिनिधी श्याम पहुरकरशेतकऱ्यांचे कैवारी विदर्भविर मा.आमदार स्व.भाई के आर पाटील यांची जन्मभुमी असलेल्या करमोळा येथे छोटेखानी आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रतिमेचे पुजन करून शेकडो ग्रामस्थांनी एकत्रीत येत जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आलेल्या मान्यवरांनी त्यांच्या जिवन चरित्रावर प्रकाश टाकत मनोगत व्यक्त केले. मान्यवरांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीती असलेल्या खेडे गावच्या करमोडा भुमीमधे भाई के आर पाटील यांची जन्मभूमी आहे. शेतकरी व शेतमजूरांचा आधार म्हणून त्यांनी त्यांच्या कार्यकाळात काम केले अविस्मरणीय आहे.त्यावेळेस पडलेले दुष्काळ, शेतकरी,मजुरांवर आलेले संकटे रोखण्यासाठी केलेले कार्य अजुनही काहीतरी सांगुन जाते. स्व. भाई के आर पाटील यांचे विचार आत्मसात करून शेतकरी चळवळ उभी करणे हीच काळाची खरी गरज आहे. असे वक्त्यांनी मत व्यक्त करतांना सांगितले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button