. “मुक्ताईनगरात राजकीय समीकरणात बदलाची चाहूल — लखन भाऊ पानपाटील यांचं नाव अग्रस्थानी”

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी | मुक्ताईनगर
मुक्ताईनगर तालुक्यातील सामाजिक कार्यात सातत्याने अग्रेसर राहिलेले पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष लखन भाऊ पानपाटील हे आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या उमेदवारीबाबत सध्या तालुक्यात तसेच जिल्हाभरात चर्चेची जोरदार चर्चा रंगली आहे.
गोर-गरीब, वंचित आणि सर्वसामान्य घटकांच्या प्रश्नांवर लखन भाऊ पानपाटील यांनी सातत्याने काम करत, सामाजिक न्याय आणि समतेचा विचार जपला आहे. त्यांच्या कार्यातून त्यांनी समाजातील वंचित घटकांपर्यंत सेवा पोहोचवण्याचा प्रयत्न केला असून, त्याचमुळे जनतेत त्यांच्याविषयीचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
सामाजिक बदलाची प्रेरणा
पॅंथर सेनेच्या कार्याचा पाया डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शहीद भगतसिंग, आणि आण्णाभाऊ साठे यांच्या क्रांतिकारी विचारांवर आधारलेला आहे. “समाजात अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे आणि स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार मिळवून देणे” हीच संघटनेची दिशा आहे.
समाजोन्नतीसाठी उपक्रम
पॅंथर सेनेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी शिक्षण, आरोग्य, आणि सामाजिक जनजागृतीसाठी उपक्रम राबवले जातात.
वंचित विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मार्गदर्शन शिबिरे,
बेरोजगार युवकांसाठी स्वावलंबन प्रशिक्षण,
तसेच महिलांसाठी आर्थिक सक्षमीकरण कार्यक्रम आयोजित केले जातात.
ग्रामीण भागात सामाजिक विषमता कमी करण्यासाठी संघटनेने अनेक आंदोलनांमधून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले आहे.
युवा वर्गात त्यांचे व्यक्तिमत्व प्रेरणादायी ठरत असून, अनेक युवक त्यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक कार्यात सहभागी झाले आहेत. त्यामुळेच समाजबांधव आणि युवक वर्गाकडून त्यांच्या उमेदवारीसाठी एकमुखी मागणी होत आहे.
राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की, लखन भाऊंच्या नेतृत्वामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत स्थानिक राजकारणाला नवे समीकरण मिळू शकते. जनतेत त्यांचा प्रभाव आणि सेवा कार्याची नाळ खोलवर जोडलेली असल्याने त्यांच्या उमेदवारीला भक्कम जनाधार लाभण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



