संग्रामपूर तालुका शिक्षक पतसंस्थेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड…!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
वरवट बकाल:- २५ मार्च २०२६
संग्रामपूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित (र.नं. ११५३), वरवट बकाल येथील नियोजित प्रक्रियेनुसार आज दिनांक २५ मार्च २०२६ रोजी रिक्त पदांसाठी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. मागील अध्यक्ष, उपाध्यक्ष, मानद सचिव व खजिनदार यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिल्यानंतर, सर्वानुमते नवीन कार्यकारणी घोषित करण्यात आली आहे.
नवनिर्वाचित पदाधिकारी खालीलप्रमाणे:
अध्यक्ष: श्री. शामलकुमार कौलकार
उपाध्यक्ष: श्री. गणेश र. भास्कर
मानद सचिव: कु. आशा सु. रौंदळे
खजिनदार: श्री. सतिश खंडेराव
निवड प्रक्रिया आणि उपस्थिती:
ही निवड प्रक्रिया अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात आणि एकमताने पार पडली. यावेळी सुकाणू समितीचे सदस्य तथा तज्ञ संचालक मा. गौतमराव मारोडे यांच्या नेतृत्वात निवड प्रक्रिया पार पडली यावेळी श्री. सुधीर दाते, श्री. प्रकाश हागे, श्री. मिलिंद सोनोने, श्री. अनिल धनभर, श्री. शंकर बगाडे (माजी अध्यक्ष) तसेच पतसंस्थेचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
संस्थेच्या प्रगतीचा आलेख असाच उंचावत ठेवण्याचा मानस नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला. तालुक्यातील शिक्षक वर्गातून सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन होत असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत…..✍️



