श्री ओलांडेश्वर मंदीर दरवर्षी प्रमाणे सोमवारी गर्भगृह सजविणार शेवटच्या श्रावण सोमवारी शिवलिंग सजविण्याची

श्रावण विशेष !
श्री ओलांडेश्वर मंदीर दरवर्षी प्रमाणे सोमवारी गर्भगृह सजविणार शेवटच्या श्रावण सोमवारी शिवलिंग सजविण्याची प्रथा
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगांव : – मालेगाव नागरतास रोडवरील रामराव झनक कॉलेजच्या जवळ असलेले पुरातन ओलांडेश्वर महादेवाचे मंदिर हे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा शंभो ग्रुप च्या वतीने श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी श्री ओलांडेश्वर मंदिर व शिवलिंग विविध प्रकारच्या व महादेवाला प्रिय असणाऱ्या फुलांनी सजविण्यात आले होते पंचक्रोशितील सर्व भाविकांनी मोठ्या संखेने दर्शनासाठी गर्दी केली होती रोडवरील हे अतिशय सुंदर शांत आवारात असलेले ओलांडेश्वर महादेवाचे मंदिर आहे तेथे सर्व भाविक दर्शनाला सायंकाळी पाच वाजल्यापासून दर्शनाकरिता येतात व तिथे ओलांडेश्वराचे मंदिर असून आत गर्भगृहामध्ये अतिषय महादेवाची मूर्ती व समोर शिवलिंग तसेच मंदिराच्या बाहेर झाडाखाली नंदिश्वर आहे येथे सर्व मालेगाव तालुक्यातील भाविक दर्शनाकरिता येत असतात तसेच यावेळी दरवर्षीप्रमाणे शंभू ग्रुपच्या वतीने तिसऱ्या श्रावण सोमवारी महाप्रसाद चे वाटप ही करण्यात आले व यावर्षीही सुद्धा श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी श्री ओलांडेश्वर संस्थान मंदिर विविध प्रकारच्या फुलांनी सजविण्यात आले आहे, यावेळी मंदिर सजावट करण्याकरिता सहभाग शंभो ग्रुपचे भक्त किशोर शिंदे,सागर पवार,आतिश बोकन,रोशन देवळे,रवी राऊत,गजानन गोरे,राहुल सानप,रुपेश बाणाईतकर,मनीष लांजेवार,पवन देवळे,
गजानन खिलपाडे,
अंकित बानाईतकर,यश घुगे,बाळू बुडालकर,विजय देवळे,इत्यादी सह सहकार्य भावी भक्तांनी केले.



