जळगाव(जामोद)रेल्वे क्रॉसींगवर होणार उड्डाणपूल.

________प्रेस नोट_______ 💥जळगाव(जामोद)रेल्वे क्रॉसींगवर होणार उड्डाणपूल.💥आ एकडे यांच्या लक्षवेधीवर सार्व बांधकाम मंत्री यांची शिफारस 💥मलकापूर अर्बन बँकेच्या ठेवीदारांचाही विचारला प्रश्न —————————————- स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे नांदुराः दि १७जुलै ते ४ऑगस्ट २०२३या दरम्यान मुंबई येथे झालेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश एकडे यांनी बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जळगाव(जामोद)रेल्वे क्रॉसींगवरील उड्डाणपूलाबाबत लक्षवेधी लावून तसेच मतदारसंघातील जनसामान्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, अडचणी यांचा संसदीय आयुधांचा वापर करीत जसे तारांकित प्रश्नांच्या माध्यमातून विधानसभेत उहापोह करून मतदारसंघातील अनेक प्रश्न मार्गी लावले यामध्ये प्रामुख्याने नांदुरा ते जळगाव(जामोद)रस्त्यावरील रेल्वे क्रॉसींगवरील उड्डाणपूलाबाबत सर्वंकष बाबींचा विचार करून ४जुलै रोजी विधानसभेत लक्षवेधी मांडून सभागृहाचे या अतिशय महत्वाच्या समस्येकडे लक्ष वेधले लक्षवेधीला उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की रेल्वे उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय महारेल मार्फत प्रस्ताव विचारात घेऊन शिफारस करण्यात आली असून त्यानुसार महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि (एम आर आय डी सी एल)ने उड्डाणपूलाचे जीएडी व प्रस्ताव सादर केलेले होते त्यानुसार सन २०२३-२४च्या केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या वार्षिक नियोजन आराखड्यात रु १३०कोटी किंमतीच्या प्रकल्पाचा समावेश करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे सदर कामास रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय भारत सरकार यांची मंजुरी प्राप्त होताच निविदा प्रक्रिया पूर्ण करून सदर बांधकाम महारेल मार्फत करण्यात येईल त्याचप्रमाणे सभागृहात उपस्थित केलेल्या विविध तारांकित प्रश्नांमध्ये १) मलकापूर अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेने छोट्या ठेवीदारांसोबत राज्यातील पतसंस्थांचे ३००कोटी रु अडकवून ठेवणाऱ्या मलकापूर अर्बन बँकेच्या गैरव्यवहाराच्या कामकाजाची कलम ८८अन्वये महिन्याभरात चौकशी करून चौकशी अहवालाप्रमाणे दोषी संचालकांवर कार्यवाही करुन सामान्य ठेवीदारांना न्याय मिळवून द्यावा 2) शेतकऱ्यांना धान्याऐवजी रोख रक्कम सुद्धा मिळत नसल्याच्या प्रश्नाला जोरकसपणे मांडले 3) कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळत नसल्याचा मुद्दाही उपस्थित केला 4) प्रवाश्यांच्या सोयीसाठी तसेच प्रदूषण कमी करण्यासाठी मलकापूर आगाराला ४०इलेक्ट्रीक बसेस पुरविण्याबाबतचे निवेदन २०एप्रिल २०२३रोजी माननीय मुख्यमंत्र्यांना दिले त्यावर शासनाने कोणती कार्यवाही केली तसेच एस टी महामंडळाच्या जुन्या व नादुरुस्त बसेस मुळे अपघातांचे प्रमाण वाढत असून नवीन बसेस पुरविण्यात याव्यात ही मागणी मुख्यत्वे मांडली 5) महावितरणने केलेल्या वीजदरवाढीचा शासनाने फेरविचार करून सामान्य जनतेच्या भावनांचा विचार करून वीज दरवाढ रद्द करावी याबाबत विधानसभेत आवाज बुलंद केला 6) प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत घरकुलांचे रखडलेले अनुदान लाभार्थ्यांना वेळेवर देण्याची मागणी लावून धरली 7) मलकापूर येथील हुतात्मा वीर जगदेवराव सहकारी सूतगिरणीत भविष्य निर्वाह निधीचा टेबल तातडीने सुरु करून सुतगिरणी कामगारांना न्याय मिळावा याकरिता सभागृहात सरकारचे लक्ष या मुद्द्याकडे वळविले 8) जिल्ह्यातील सहा हजार कृषी पंपाना कोटेशन भरुणही अद्यापही वीजजोडणी झाली नसल्याचा मुद्दा विधानसभेत जोरदारपणे उचलून कृषीपंपाच्या वीज जोडण्या तात्काळ करण्यात याव्यात याकडे उर्जा विभागाचे लक्ष वेधले 9) राज्यातून गेल्या तीन महिन्यात ५हजार ६१०तरुणी तर बुलढाणा जिल्ह्यातून गत तीन महिन्यातून २३०अल्पवयीन मुलींसह बेपत्ता झालेल्या महिलांना शोधण्यासाठी राज्याच्या गृह विभागाकडून कोणत्या ठोस उपाययोजना करण्यात आल्या या सामाजिकदृष्ट्या अतिशय गंभीर प्रश्नाला विधानसभेत वाचा फोडली १०) जिल्ह्यातील गट विकास अधिकारी यांच्या बहिष्कारामुळे रोजगार हमी योजनेची कामे खोळंबली असून याबाबत रोजगार हमी योजना मंत्र्यांनी दखल घ्यावी ११) जिल्ह्यातील राष्ट्रीय कृषी विकास योजना कॅफेटेरीया अंतर्गत सन २०२२-२३सर्वसाधारण प्रवर्गासाठी चौथ्या हफ्त्याच्या ७८कोटी व त्या समरुप हिश्श्याच्या ५२कोटी असा एकूण १५०कोटी रुपयांचा निधी लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत पोहचला नसल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिली १२) मलकापूर शहरामध्ये महावितरणच्या उघड्या रोहित्रांमुळे नागरिकांच्या जीवाला धोका असल्याने उर्जा विभागाचे या समस्येकडे लक्ष वेधले १३) मलकापूर-बुलढाणा-चिखली रस्ता (राष्ट्रीय महामार्ग क्रं ७५३ए )चे कॉंक्रीटीकरण व चौपदरीकरण करण्याबाबतचे निवेदन माहे २२एप्रिल २०२३रोजी दिले होते त्यावर शासनाकडून कोणती कार्यवाही झाली असे उत्तर मागितले १४) जिल्ह्यातील १६शासकीय गोदामातून स्वस्त धान्य दुकानांकरीता नित्कृष्ट दर्जाच्या गव्हाचा पुरवठा होत असल्याबाबतचा प्रश्न अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांच्या समोर ठेवला १५) महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समीतीच्या विविध मागण्यांबाबत शासनाकडून कोणत्या धोरणात्मक उपाययोजना करण्यात आल्या याकडे सभागृहात शालेय शिक्षण मंत्र्यांना प्रश्न केला १६) तसेच सेवानिवृत्त एस टी कामगारांना मोफत प्रवास पास देण्याबाबतच्या चर्चेत सहभाग घेतला १७) जिल्ह्यातील नांदुरा व मलकापूर शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेकरीता अमृत २.०योजनेतंर्गत निधी मिळावा याकरीता २८डिसेंबर २०२२रोजी मा मुख्यमंत्री यांना निवेदन दिले होते या महत्वपूर्ण विषयावर अद्याप पर्यंत नगर विकास विभागाकडून कोणती कार्यवाही करण्यात आली असे तारांकित प्रश्नाद्वारे लक्ष वेधण्यात आले १८) तसेच नांदुरा नगर परीषद मधील हद्दवाढ झालेल्या भागाचा विकास करण्यासाठी निधी मिळावा यासाठी २७फेब्रुवारी २०२३रोजी मा मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनावर नगर विकास विभागाने तातडीने निधी मंजूर करावा यासाठी आवाज उठविला. १९) घाटाखालील तालुक्यांना सुजलाम सुफलाम करणाऱ्या महत्वाकांक्षी जिगाव प्रकल्पामध्ये नांदुरा तालुक्यातील १४वंचित गावांचा लाभ क्षेत्रामध्ये समावेश करण्याबाबतचा प्रश्न जलसंपदा विभागाला विचारुन शासनाचे या मुख्य प्रश्नाकडे लक्ष वेधले २०) मलकापूर विधानसभा मतदार संघातील सिंचनाचा अनुशेष असणाऱ्या वजीराबाद,जलालाबाद,देवधाबा, जांभुळधाबा,भालेगाव इत्यादी व अन्य २५ते ३०खेडे बोदवड सिंचन प्रकल्पामध्ये समाविष्ट असून सदर रखडलेल्या योजनेला गती देण्याकरिता शासनाच्या जलसंपदा विभागाने काय उपाययोजना केल्या याबाबतचा प्रश्न विधानसभेत विचारला २१) तर दुधाळ जनावरे वाटप करण्याच्या योजनेतंर्गत बुलढाणा व अकोला जिल्ह्यातील जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयाद्वारे लाभार्थ्यांच्या अंतिम यादीमध्ये घोळ केला असल्याबाबतचा प्रश्न उचलून दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करीत योग्य लाभार्थ्यांना दुधाळ जनावरांचा लाभ मिळण्यासाठी सुधारित यादी तयार करावी अशी मागणी विधानसभेत पावसाळी अधिवेशन दरम्यान प्रश्न उपस्थित केले.



