गुन्हेगारीबुलढाणा

अल्पवयीन मुलीचा विनयभंग

अल्पवयीन मुलीचा विनयभंग युवकाविरुध्द गुन्हा. स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव

प्रतिनिधी श्याम पहुरकर शेगाव शहरातील सुदामानगर भागामध्ये राहणाऱ्या एका बारा वर्षीय मुलीचा तिच्या घरामध्ये प्रवेश करून पंचवीस वर्षीय युवकाने विनयभंग केल्याप्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी १ मार्च रोजी त्याचेवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.याबाबत स्थानिक सुदामा नगर भागातील एका २८ वर्षीय रहिवासी महिलेने शेगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली की, लहान मुलगी आजारी असल्यामुळे आपण दवाखान्यात असताना घरी एक बारा वर्षीय मुलगी एकटी होती. २६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता दरम्यान शेख फारूक शेख वाजिद वय २५ वर्षे रा. श्रीकृष्ण नगर शेगाव, या युवकाने माझे घरात प्रवेश करून बारा वर्षीय मुलींचा विनयभंग केला. अशा तक्रार वरून शेगाव शहर पोलिसांनी याप्रकरणी कलम ३५४, ३५४ अ, ४५२, ५०६ भांदवी सह कलम ८, १२ पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पीएसआय डांगे करत आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button