तेल्हारा येथील पत्रकार भवनात स्थानिक व तालुक्यातील सहा पत्रकारांना पत्रकार दिनी कार्य गौरव पुरस्कार बहाल!, सोबतच पूर्णाकाठ न्यूज चे मान्यवरांच्या हस्ते विमोचन!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी विजय घोडे
तेल्हारा दि.7 जानेवारी 2025| तेल्हारा येथील पत्रकार भवनातील बाळ गंगाधरशास्त्री जांभेकर सभागृहात सोमवार दि. ६ जानेवारी 2025 च्या सकाळी पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या पत्रकार दिनी जेष्ठ पत्रकारांचा पुरस्कार देऊन सन्मान तसेच पूर्णकाठ न्यूज चे विमोचन करण्यात आले. मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांनी सहा जानेवारी 1832 रोजी दर्पण वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित केला त्यामुळे 6 जानेवारी हा दिवशी पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून तेल्हारा शहरासह तालुक्यातील सहा ज्येष्ठ पत्रकारांचा स्मृति पुरस्कार देऊन त्यांच्या उत्कृष्ट कार्याचा गौरव करण्यात आला .याप्रसंगी पूर्णकाठ न्यूजचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विमोचन सुद्धा करण्यात आले आले. तेल्हारा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रल्हादराव ठोकणे यांच्या अध्यक्षतेखाली तर ज्येष्ठ पत्रकार सुरेश शिंगणारे यांचे प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमा च्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आद्य पत्रकार , दर्पणकार बाळ गंगाधरशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार दादाराव खरपकार पंचगव्हाण , रामदास कोरडे कोठा, वासुदेवराव नासणे तेल्हारा, मधुकरराव मानकर, भांबेरी , बसवेश्वरआप्पा मिटकरी तेल्हारा, सेवकराम हेरोडे यांचा अनुक्रमे शेतकरी स्व. अंगदलाल चौधरी, पत्रकार स्व. संजय अहेरकर, अकोट येथील प्रसिद्ध रंगकर्मी स्व. रामभाऊ उपाख्य तात्यासाहेब शिंगणारे, स्व. भाई प्रभाकरराव सावरकर, स्व. जेठमल जोशी, स्व. गुलाबराव खारोडे आदींच्या स्मृतिप्रीत्यर्थ कार्य गौरव प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक व संचालन धर्मेश चौधरी यांनी केले. पुरस्कार प्राप्त पत्रकार रामदास कोरडे यांनी मनोगतातून पत्रकार संघाने राबविलेल्या या उपक्रमाची प्रशंसा केली. यावेळी प्रल्हादराव ठोकणे, सुरेश शिंगणारे, सत्यशिल सावरकर, अनंत अहेरकर, सदानंद खारोडे, रामाभाऊ फाटकर, अनिल जोशी, विद्याधर खुमकर, राहुल मिटकरी, विजय मनोहर घोडे, राम खरपकार, धनंजय मानकर, सुरज इंगोले, राजू नेमाडे यांचे सह आदी पत्रकार व सहकारी , नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धर्मेश चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन राजू नेमाडे यांनी केले.



