Uncategorizedजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगर

संत मुक्ताबाई महाशिवरात्री यात्रेसाठी आरोग्य विभाग सज्ज

भाविकांच्या सेवेसाठी २४ तास वैद्यकीय चमू तैनात

मुक्ताईनगर । प्रतिनिधी

श्री संत मुक्ताबाई (महाशिवरात्री) यात्रेनिमित्त १२ ते १७ फेब्रुवारी या कालावधीत लाखो भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा असून, आरोग्य विभागाने यात्रेसाठी व्यापक तयारी केली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, मुक्ताईनगर’ यांनी विशेष आरोग्य कृती आराखडा तयार केला असून कर्मचाऱ्यांची नियुक्तीही जाहीर करण्यात आली आहे. आमदार श्री. चंद्रकांत निंबाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमितकुमार घडेकर यांनी यात्रेतील आरोग्यसेवा व व्यवस्थापनाचे सविस्तर आदेश निर्गमित केले.

यात्रेच्या काळात भाविकांना कोणत्याही आरोग्यविषयक अडचणी येऊ नयेत, यासाठी आरोग्य विभागाने पाणी शुद्धीकरण आणि स्वच्छतेवर विशेष भर दिला आहे. संबंधित गावांतील पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जात असून अहवाल येईपर्यंत त्यावर विशेष लक्ष ठेवले जाईल. यात्रा परिसरात पाणी शुद्धीकरणासाठी आरोग्य सेवकांची नियुक्ती करण्यात आली असून ग्रामपंचायतींमार्फत टीसीएल पावडरची उपलब्धता करून दररोज ओ.टी. टेस्ट घेतली जाणार आहे.

मुक्ताईनगर नगरपंचायत व ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा आणि स्वच्छतेसाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. यात्रेच्या ठिकाणी मुख्य चार वैद्यकीय केंद्र स्थापन करण्यात आले आहेत, ज्यामध्ये नवीन मुक्ताई मंदिर, जुने मुक्ताई मंदिर-कोथळी, चांगदेव मंदिर आणि मेहुण मंदिर यांचा समावेश आहे. या केंद्रांवर सकाळी ८ ते संध्याकाळी ६ आणि रात्री ६ ते सकाळी ८ अशा दोन शिफ्टमध्ये वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी (सीएचओ), आरोग्य सेवक/सेविका, आरोग्य सहाय्यक आणि मदतनीस तैनात राहणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीसाठी मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयाची १०८ रुग्णवाहिका आणि इतर प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या रुग्णवाहिका + २४ तास तैनात राहणार आहेत. नियोजनात डॉ. सुधा चौधरी, डॉ. संदीप चौधरी, डॉ. स्वाती पाटील आणि डॉ. शैलेश पाटील यांसारख्या अनुभवी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे विविध केंद्रांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आला असून मंदिर व्यवस्थापन समिती व स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून प्रथमोपचार कक्षांच्या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमितकुमार घडेकर यांनी सांगितले की, “भाविकांना कोणत्याही प्रकारचा आरोग्यविषयक त्रास होऊ नये, यासाठी आमचे पथक सज्ज आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button