संग्रामपूर, जळगाव जामोद, तालुक्यातील पुरग्रस्तांना

(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)
सरकारकडून मदत मिळाली नसल्याने स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी जळगाव येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर शेकडो पुरग्रस्तांसह बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.
२२ जुलै रोजी महापुराच्या पाण्याने संग्रामपूर जळगाव तालुक्यातील ५० हजार हेक्टर जमीन खरडून गेली, अनेक गावात महापुराचे पाणी शिरल्याने घरे वाहून गेली त्यातील काही लाभार्थी सानुग्रह अनुदानापासुन वंचित आहेत, शेकडो जणावरे पुरात वाहून गेले आहेत. शेतातील पोल,डिप्या पडल्याने कृषी पंपाचा विज पुरवठा खंडित आहे. बंधाऱ्याचे निकृष्ट दर्जाचे काम केल्याने बंधारे तुटले बांध फुटले याची दुरुस्तीचे शासनाचे नियोजन नाही. या पुरग्रस्तांकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. जो पर्यंत पुरग्रस्तांना न्याय मिळणार नाही तो पर्यंत आंदोलन थांबणार नाही असा संकल्प आंदोलकांनी केला आहे.



