सप्तखंजेरीवादक डॉ रामपाल महाराज आज पातुर्ड्यात. संध्याकाळी ७ वाजता भव्य किर्तनाचा कार्यक्रम

*सप्तखंजेरीवादक डॉ रामपाल महाराज आज पातुर्ड्यात. संध्याकाळी ७ वाजता भव्य किर्तनाचा कार्यक्रम.**पंचक्रोशीतील समाजबांधव व महिला भगिनींनी उपस्थित रहा!प्रशांत डिक्कर यांचे आवाहन.*संग्रामपूर : तालुक्यातील पातुर्डा येथे आज बुधवार दि.११ जानेवारी संध्याकाळी ७ वाजता आठवडी बाजार पटांगणात सप्तखंजेरी वादक समाजप्रबोधक सत्यपाल महाराज व संदिपपाल महाराज यांचे शिष्य डॉ रामपाल महाराज यांचा किर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील सर्वच घटकातील बांधव, महिला भगिनींनी व युवकांनी उपस्थित रहा असे आवाहन स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांनी केले आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरून सप्तखंजेरीच्या माध्यमातून महापुरुषांच्या कार्याचे दाखले देत या काळातील भरभटलेला समाजाला एक चांगली दिशा देण्याचे काम डॉ रामपाल महाराज अनेक वर्षांपासून आपल्या किर्तनातुन करीत आहेत. महाराज अनेक वेळा आपल्या किर्तनातुन सांगतात व्यसन ही मानवी जीवनाला लागणारी किड आहे. ज्यामुळे अनेक सुखी कुटुंबाची दुर्दशा होते. तरुण पिढी व्यसनाच्या आहारी चालली आहे. तरुण पिढी व्यसनाच्या आहारी किंवा चुकीच्या मार्गाने जात असेल तर त्यांना वेळीच थांबवणे काळाची गरज आहे. होतकरू तरुण व्यसनाच्या आहारी जाऊन त्यांचे आयुष्य तर अंधारात ढकलतातच आणि त्याबरोबर माणुसाचे एक उज्ज्वल भविष्याचे स्वप्नदेखील विरून जाते. आपण अंदाज घेऊ शकणार नाही असे भीषण व्यसनांचे वास्तव आहे. भारतातील मनोरुग्णांत ६०टक्के मनोरुग्ण दारुच्या आहारी गेल्यामुळे झाले आहेत, जगामध्ये प्रतिवर्षी अंदाजे दशलक्ष नवीन कर्करोगग्रस्त रुग्णांचे निदान, त्यामध्ये ६ दशलक्ष पेक्षाही अधिक मृत्यु होतात,देशातील एकूण् कर्करोगाच्या प्रमाणापैकी ३४% कर्करोग तंबाखूमुळे होतात, चोऱ्या, दरोडे आणि बलात्कार यांसारखे गंभीर गुन्हे नशेच्या अधीन गेल्यामुळे होतात, घरगुती हिंसाचाराचे प्रमुख कारण व्यसन आहे,रस्त्यांवर होणारे अनेक अपघात व्यसनाधीन असल्यानेच होतात, धूम्रपान केल्याने हृदयरोग, कॅन्सर आणि फुफ्फुसांचे आजार अशा गंभीर समस्या उद्भवतात, धुम्रपानामुळे फुफ्फुस, स्वरयंत्र्, अन्ननलिका व श्वसनलिकेचा कर्करोग होतो, धुम्रपान स्वादुपिंड, मूत्राशय, मुत्रपिंड, मुत्रनलिका, प्लिहा व गर्भाशय मुखकर्करोग होण्यासही बऱ्यापैकी कारणीभूत व्यसन आहे. या व्यसनाच्या विळख्यात अडकुच नये असे रामपाल महाराज आपल्याला किर्तनातुन सतत सांगण्याचा प्रयत्न करतात. कारण आपण ग्रामीण भागात राहणारे लोक आहोत. रात्रंदिवस काबाडकष्ट करून शेतकरी, शेतमजुर अन्नधान्य पिकवतो. शेतात राबतो म्हणून अर्थव्यवस्थेची चाके चालतात.कारण भारतातील अर्थ व्यवस्था देखील शेती उद्योगाशी निगडित आहे. भारतीय समाज व्यवस्थेतील हा कष्टकरी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. शेतीवर उद्योगधंदे, पशुधन आणि मानवी जीवन अवलंबून असते. शेतीचे चाके थांबल्यास सर्व जनजीवन उध्वस्त होण्या शिवाय पर्याय नसतो. कारण अन्नधान्य, भाजीपाला, दुग्धजन्य पदार्थ या सारखे जिवनाश्यक बाबीचा निर्माता हा शेतकरी आहे म्हणून शेतकऱ्याला ‘जगाचा पोशिंदा’ म्हटल्या जाते. समाजव्यवस्था अबाधित रहावी म्हणून उन, पाऊस, थंडी, वादळी वारा अशां आपदांचा कसलाही विचार न करता, न थकता बारामाही राबणारा पोशिंदा म्हणजेच शेतकरी शेतमजुर होय. या कृषीप्रधान देशात शेती व शेतकऱ्यांना अर्थात जगाच्या पोशिंद्याला सन्मानाचा दर्जा दिला जावा. त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त व्हावी. या निष्ठेने शेतकरी शेतमजुरांच्या सन्मानार्थ माझे कर्तव्य म्हणून अभिनव संकल्पना यातूनच शेतकरी शेतमजूरांचा सन्मान, कृतज्ञता व आत्मबळ वाढवण्यासाठी शेतकरी शेतमजूर सन्मान सोहळा आयोजित केला आहे. निमित्त सप्तखंजेरी वादक समाजप्रबोधक डॉ रामपाल महाराज यांचा बुधवार दि.११ जानेवारी संध्याकाळी ७ वाजता भव्य किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील सर्वच घटकातील पुरुष, महिलांनी व युवकांनी उपस्थित रहावे असे आवाहन स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांनी केले आहे. स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस बुलढाणा प्रतिनिधी रामा इंदोरे



