बुलढाणामहाराष्ट्र

शितला माता संस्थान माळेगाव बाजार यांच्या वतीने संगीतमय शिवमहापुराण कथा वाचन व हरीनाम सप्ताहाचे आयोजन

शितला माता संस्थान माळेगाव बाजार यांच्या वतीने संगीतमय शिवमहापुराण कथा वाचन व हरीनाम सप्ताहाचे आयोजन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी : माळेगाव बाजार

तेल्हारा तालुक्यातील चंफामाता ग्राम दैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या
माळेगाव बाजार येथे शिव महापुराण यज्ञ व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन २६ जानेवारी पासून ते २फेब्रुवारी पर्यंत करण्यात आले आहे. या सप्ताहात रोज सकाळी ७ ते ९ शिव अभिषेक व दुपारी १ते४ पर्यंत शिव महापुराण कथा सायंकाळी ६ ते ७ हरीपाठ व रात्री ८ ते १० कीर्तन प्रवचन राहणार आहे.त्याचप्रमाणे या सप्ताहाचे कथावाचक हभप अरुण महाराज सावंत यांच्या वाणीतून दुपारी १ ते ४ पर्यंत कथा ऐकायला मिळणार आहे. तसेच दि.२६ जानेवारी रोजी रात्री ८ते१० हभपकृष्णा महाराज सदाफळे यांचे हरी किर्तन,दि.२७ जानेवारी रोजी हभप राजेंद्र महाराज वक्ते यांचे हरी किर्तन,दि.२८जानेवारी रोजी हभप गणेश महाराज घोंगे यांचे हरी किर्तन,२९ जानेवारी रोजी हभप ज्ञानेश्वर महाराज पातोंड यांचे हरी किर्तन,दि.३०जानेवारी रोजी हभप गौरीताई मालठाणकर यांचे हरी किर्तन,दि.३१ जानेवारी रोजी हभप कार्तिक महाराज इंगोले यांचे हरी किर्तन,दि.१फेब्रुवारी रोजी हभप अरुण महाराज सावंत यांचे हरी किर्तन,दि.२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते ११ काल्याचे कीर्तन होणार आहे.तसेच महाप्रसाद दुपारी १२ते ५ पर्यंत राहील व रात्री श्री रामदेव जिगडी भजन मंडळ माळेगाव बाजार यांचा कार्यक्रम होणार आहे. सप्ताहात संगीत कथा संच म्हणून , रवी महाराज गोतमारे, शुभम महाराज अटराळे,जयंत महाराज शिरसागर , तसेच मृदुंगाचार्य श्याम महाराज काळमेघ, अजय महाराज मोडे, सुनीलराव अ.चिकटे , गायनाचार्य राजू महाराज फुंडकर, रवींद्र महाराज विखे, श्रीकांत महाराज फोकमारे, रामेश्वर महाराज मोहनकार हे राहणार आहेत तरी या शिव महापुराण महोत्सवाचा जास्तीत जास्त भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन शितला माता संस्थान माळेगाव व समस्त गावकरी मंडळी यांनी केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button