शासकीय विश्राम गृह बुलढाणा येथे श्री तीर्थक्षेत्र अटाळी येथील युवकांचा शिवसेने मध्ये जाहीर पक्ष प्रवेश.

शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत,
केंद्रीय मंत्री शिवसेना नेते भूमिपुत्र खासदार मा.ना. श्री.प्रतापराव जाधव साहेब यांच्या खंबीर नेतृत्ववात,प्रमुख उपस्थितीमध्ये, व शुभहस्ते श्री तीर्थक्षेत्र अटाळी येथील समाजकार्यात नेहमी अग्रेसर असणारे युवा कार्यकर्ते ज्ञानेश्वर भाऊ खेकडे,महादेव भाऊ,घोरपडे,राम भाऊ गुळे,अभिषेक भाऊ भाकरे
श्याम भाऊ गुळे,तेजस भाऊ सुलताने यांच्यासह युवकांचा शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश करण्यात आला या पक्षप्रवेश मुळे अटाळी क्षेत्रामध्ये शिवसेनेला मोठ्या प्रमाणात बळकटी मिळणार आहे,कारण खामगाव तालुक्यातील राजकारणातील केंद्रबिंदु म्हणून ओळख असणाऱ्या अटाळी गावामधून अनेक चढउतार घडविले आहेत, अशातच शिवसेना पक्षामध्ये युवकांनी केलेला पक्ष प्रवेशाला अधिक महत्त्व प्राप्त झालेले आहे,येत्या काही दिवसात युवक मोठ्या प्रमाणात शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत. यावेळी उपस्थित शिवसेना बुलढाणा जिल्हा सह संपर्क प्रमुख शांताराम भाऊ दाणे, शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष भाऊ डिवरे, शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल भाऊ अंधारे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख पिंटूभाऊ धोरण,शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र भाऊ बघे,शिवसेना तालुकाप्रमुख मोताळा रामदास भाऊ चौथंनकर शिवसेना उपतालुकाप्रमुख गोपाल भाऊ भिल,शिवसेना उप तालुकाप्रमुख संतोष भाऊ दुतोंडे, शिवसेनेचे रवी भाऊ तिव्हाणे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते….



