महाराष्ट्रविदर्भसामाजिक
पुरात वाहून गेलेल्या इसमाच्या पत्नीला आमदार राजेश एकडे यांच्या हस्ते ४ लाख रुपयांचा धनादेश प्रदान स्टार भारत लाईव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे

नांदुराः शहर व तालुक्यात २३सप्टेंबर च्या रात्री कोसळधार पाऊस पडला यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतीचे,घरांचे नुकसान झाले त्याचबरोबर जीवीतहानी व पशुधनाची सुद्धा हाणी झाली .
पडलेल्या पावसामुळे तालुक्यातील नदी,नाले दुथडी भरून वाहू लागले.
माटोडा येथील मृतक प्रशांत दांडगे हे आपल्या वडीलांची औषधे घेण्यासाठी येत असतांना पाण्याचा अंदाज न आल्याने केदार नदीला आलेल्या पुरात वाहून गेले होते.
नैसर्गिक आपत्तीमुळे मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना शासनाचे मदतीचे धोरण असून त्या अनुषंगाने मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश एकडे यांच्या हस्ते रेणुका प्रशांत दांडगे यांना ४ लाख रुपयांचा धनादेश त्यांच्या घरी माटोडा येथे जाऊन देण्यात आला.
यावेळी महसूल मंडळ अधिकारी रमेश उगले हे उपस्थित होते.



