महाराष्ट्र

पोलिसाच्या नाकावर टिचून अवैध धंदे सुरु

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगाव -: डोंगरकिंही सर्कल अंतर्गत येत असलेल्या संपूर्ण गावामधे पोलिसाच्या शुभ आशीर्वादाने अवैध धंदे अतिशय जोरात सुरू आहेत त्यात प्रामुख्याने गावठी दारू देशी दारू जुगार गुटखा पण पोलीस प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे या दारू आणि जुगारा मुळे अनेकांची संसार उध्वस्त झालेले आहेत परंतु पोलीस प्रशासन हप्ते गोळा करण्यात मग्न आहे.या बाबत वारंवार अवैध धंदे बंद करण्यात यावे अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे.परंतु राज्य उत्पादन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच मालेगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी यांचे अवैध धंदे चालविणारे लोकांन सोबत आर्थिक हित सबंध असल्यामुळें त्यांचे वर कोणतीही कार्यवाही करीत नाहीत.त्यामुळे सर्व सामान्य कुटुंब उध्वस्त होत असून याला फक्त सबंधित प्रशासन जबाबदार आहे.या अधिकारी यांचा `एकच नारा महिलांचा संसार उध्वस्त करा, महिलांचा अपमान देशाचा सन्मान असे म्हणण्याची वेळ सद्या महीलावर आलेली आहे.आता तरी झोपेचे सोंग घेतलेले पोलीस प्रशासन जागी होईल का व या सर्कल मधील अवैध धंदे चालकावर कार्यवाही करतील का असा प्रश्न सर्वच स्तरातून उपस्थित होत आहे तसेच तात्काळ यांचे वर कार्यवाही झाली नाही तर जन आंदोलन करण्यात येईल असा इशाराही या निमित्ताने नागरिकाकडून देण्यात आला. आणि जर या बीटचे जमदार आणि कर्तव्यदक्ष ठाणेदार यांनी जर या अवैध धंद्यावर कारवाई केली नाही तर सर्व नागरिकांनीशी वाशिम राज्य उत्पादन शुल्क यांच्या कार्यालयावर लवकरच जन आंदोलन उभारण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी सन्माननीय ठाणेदार साहेब व बीट चे जमदार असे गावकऱ्यांच्या वतीने प्रतिनिधीशी कळविण्यात आले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button