सामाजिक
पत्रकार ऋषिकेश देठे यांनी केले मातोश्री रमाबाई आंबेडकर यांना अभिवादन

स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलढाणा जिल्हा ग्रामिण प्रतीनीधी ऋषिकेश देठे
आज दि 07/02/1898
या दिवशीं दलित समाजात मातोश्री रमाबाई यांचा जन्म झाला.
कधीतरी बोलले जायचे मुलांचे पाय पायण्यात दिसतात रमाबाई च्या पितांचे नाव भिक्कुजी वळणकर तर मातेचे नाव रुख्खमीनी वळणकर होते.
रमाबाई चा विवाह अगदी लहान वयात भिमराव आंबेडकरांन सोबत झाला.
रमाबाई बाबासाहेबांच्या पाठीशी खंबीर पणे उभ्या झाल्या.बाबासाहेबांच्या पाठीशी पत्नी म्हणुन नाही तर मातेसारखे सांभाळले.
रमाबाई म्हणजे वाहता पाण्याचा निर्मळ झरा
रमाबाई म्हणजे दिनदलींतांची माऊली
रमाबाईंनी स्वताचे जिवन गोरगरीबांन साठी कुर्बान केले.
आयुष्य भर समाजांची सेवा केली.
बाबासाहेबांच्या संसाराचा गाडा हाकत सैयमाने व मोठ्या धैयाने माता रमाई ने बाबासाहेबांन सोबत साऊली सारख्या उभ्या होत्या .
अश्या माय माऊलीस जयंती पावण पर्वावर त्रिवार वंदन.
🙏



